मनोज जरांगे पाटील यांची आ उढाण यांनी घेतली भेट
अंतरवालीत मनोज जरांगे पाटील यांची आ उढाण यांनी घेतली भेट
अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी पूर्वीही उपोषण केले होते, मात्र सरकारच्या आश्वासनावर त्यांनी ते थांबवले होते. आता पुन्हा एकदा आरक्षण मिळवण्यासाठी त्यांनी उपोषणाचा मार्ग निवडला आहे. आज घनसावंगीचे आमदार डॉ हीकमत उढाण यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन उपोषण थांबवण्याची विनंती केली मात्र जरांगे पाटलांनी ती नाकारली.
आमदार हिकमत उढाण यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी उपस्थित डॉक्टरांशी चर्चा करून त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याच्या सूचनाही दिल्या. पुढे ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन आरक्षण व उपोषण या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याची विनंती करतो असे सांगितले.
जरांगे पाटील यांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त करताना, आ उढाण यांनी हे उपोषण थांबवण्याचे आवाहन देखील केले आहे, पण जरांगे पाटील यांनी ठामपणे आपला निर्णय जाहीर केला आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय ते उपोषण सोडणार नाहीत.
Comments
Post a Comment