घनसावंगी तालुक्यात ऊसतोड हार्वेस्टरला अचानक आग; संपूर्ण मशीन जळून खाक

 घनसावंगी तालुक्यात ऊसतोड हार्वेस्टरला अचानक आग; संपूर्ण मशीन जळून खाक


  मौजे सिंदखेड, तालुका घनसावंगी येथे आज ऊस तोडणीसाठी वापरल्या जाणाऱ्या हार्वेस्टरला आज २१ जानेवारी रोजी अचानक आग लागल्याने संपूर्ण मशीन जळून खाक झाले आहे. या घटनेत शेतकरी भागवत आश्रुबा आधुडे यांचे उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


  ऊस तोडणीसाठी मजुरांची टंचाई असल्यामुळे शेतकरी हार्वेस्टरचा वापर करून ऊस तोडणी करत आहेत. घनसावंगी तालुक्यात ऊसाचे मोठे क्षेत्र असून, शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

अंबड-घनसावंगी तालुक्यात इतर जिल्ह्यांतील ऊस तोडणीसाठी हार्वेस्टर दाखल होत आहेत. मात्र, आजच्या घटनेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, मात्र आगीवर नियंत्रण मिळवणे अशक्य ठरले.


  अशी अचानक लागणारी आग शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक समस्या निर्माण करत आहे, त्यामुळे मशीन मालक व शेतकरी यानी ऊसतोडणी यंत्राच्या वापराच्या सुरक्षिततेबाबत अधिक जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे.

Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!