भीषण रेल्वे अपघात: जीव वाचवण्यासाठी उड्या टाकणाऱ्या प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

भीषण रेल्वे अपघात: जीव वाचवण्यासाठी उड्या टाकणाऱ्या प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू


  जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील पारधाडे रेल्वे स्थानकाजवळ एक अतिशय धक्कादायक आणि मन हेलावणारी घटना घडली. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, बंगळुरूहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेस रेल्वे गाडीच्या चाकांमध्ये घर्षण होऊन आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यानंतर गाडीला आग लागल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. या अफवेने घाबरलेले प्रवासी गाडीबाहेर उड्या मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न करू लागले.

  मात्र दुर्दैवाने समोरून येणाऱ्या बंगळुरू-कर्नाटक रेल्वे गाडीखाली काही प्रवासी सापडले आणि त्यात अनेकांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांवर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्पष्टीकरण: हा अपघात घातपात नाही

 

  महाराष्ट्रातील एका दुर्दैवी रेल्वे अपघातानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, सदर अपघात हा घातपात नसून अपघाती घटना आहे.

  अपघाताच्या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पाटील म्हणाले की, "हा अपघात घातपात नाही, तरी चौकशी चालू असून संपूर्ण माहिती लवकरच उपलब्ध होईल." तसेच प्रशासनाने तात्काळ मदत कार्य हाती घेतले असून जखमींवर योग्य उपचार केले जात आहेत.

  दरम्यान, या घटनेमुळे मृत आणि जखमी झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!