अंबड तालुक्यात दुचाकी अपघातात तीर्थपुरीतील तरुण ठार, एक गंभीर

अंबड तालुक्यात दुचाकी अपघातात तीर्थपुरीतील तरुण ठार, एक गंभीर !

कुरण फाटा,शहागडजवळ घडली दुर्दैवी घटना



 वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

  अबंड तालुक्यातील गोंदी-शहागड राज्य महामार्गावर शनिवारी, २५ जानेवारी रोजी, सायंकाळी ४ वाजता एका दुचाकी अपघातात तीर्थपुरी येथील एक तरुण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. कुरण फाटा येथे घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.सतीश अरून जाधव वय ४० वर्षे (मूळ गाव रामसगाव हमु तीर्थपुरी ता घनसावंगी) असे मयत तरुणाचे नाव आहे.


  सतीश व सुरेश हे दोघे ते दुचाकीवरून शहागडहून तीर्थपुरीकडे जात होते. अचानक समोर आलेल्या वाहनामुळे त्यांनी दुचाकीचा डिस्क ब्रेक जोरात दाबला, परिणामी तोल जाऊन ते खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. यात सतीश जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबड उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला.ए.स.आय डी जी कंटुले यांनी अपघात स्थळी मदत केली 


  दुचाकीच्या पाठीमागे बसलेले सुरेश मंकाजी वानखेडे (रा. तीर्थपुरी, ता. घनसावंगी) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने अंबड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर अधिक उपचारासाठी जालना येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. सुरेश यांच्या डोक्याला आणि हाताला फ्रॅक्चर झाले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे.

मयत सतीश जाधव

  या अपघातामुळे स्थानिकांमध्ये शोककळा पसरली असून, महामार्गावर वाढणाऱ्या वाहनांची गती आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.


Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!