घनसावंगी तालुक्यात गूळ उद्योगातून तरुणांना मिळाला रोजगार; शेतकऱ्यांनाही फायदा

 घनसावंगी तालुक्यात गूळ उद्योगातून तरुणांना मिळाला रोजगार; शेतकऱ्यांनाही फायदा 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    घनसावंगी तालुक्यातील तरुणांनी पुढाकार घेत गूळ उद्योग सुरू केल्यामुळे तालुक्यात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या असून शेतकऱ्यांनाही आर्थिक लाभ मिळत आहे. तालुक्यात उक्कडगाव, नाथनगर, सिंदखेड, तीर्थपुरी येथे प्रत्येकी एक तर जोगलादेवी येथे चार गूळ युनिट उभारण्यात आले आहेत, ज्यामुळे एकूण आठ गूळ युनिट्स कार्यरत आहेत. याबरोबरच अंकुशनगर समर्थ तर तीर्थपूरी येथील सागर सहकारी साखर कारखाना, देवी दहेगाव येथील समृध्दी शुगर्स तर कंडारी येथील ब्लू सफायर फूड प्रोसेसिंग असे सर्व मिळून घनसावंगी तालुक्यात दररोज ऊसाचे गाळप होत आहे.


  पैठणच्या नाथसागर धरणातुन डाव्या आणी उजव्या कालव्यातुन शेतकऱ्यांच्या विविध पिकांसाठी पाणी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची शेती मोठ्या प्रमाणात ओलीताखाली येत आहे. यामुळे चोहीकडे हिरवेगार पिके डोलात उभी आसल्याचे दिसुन येते याच नाथसागर धरणातुन छञपती संभाजीनगर, जालना, अंबड, शहागड, गेवराई येथे पिण्याचा पाणीपुरवठा देखील होत आहे. याबरोबरच पैठण च्या जायकवाडी धरणातून उजव्या व डाव्या कालव्याला तसेच धरणात पाणी साठा वाढल्यानंतर गोदावरी नदीवरील बंधाऱ्यातही पाणी सोडण्यात येते सद्य स्थितीत नाथसागर धरण, गोदावरी नदीवरील बंधारे, नदी तुडुंब भरलेले असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपला मोर्चा ऊसशेतीकडे वळवीला आहे.


अंबड आणी घनसावंगी दोन्ही तालुक्यातील मोठी शेती पाण्याखाली येते ऊसाचे तालुके म्हणून प्रसिद्ध आहेत, या तालुक्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करतात या गूळ युनिट्समध्ये दररोज जवळपास चार हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले जाते. एका युनिटमध्ये दोन ते पाच युवकांनी मिळून गूळ उद्योग सुरू केला आहे. एका युनिटसाठी अंदाजे ३०-३५ लाख रुपये खर्च येतो. दोन भट्ट्या, कढाया, क्रेशर, गोडाऊन, सोतरी यासारख्या साधनसामग्रीसह दोन एकर जमीन लागते. यासाठी कुशल कामगार, गुळवे, ऊस तोड मजूर यांची आवश्यकता असते. एक युनिट सुरू ठेवण्यासाठी साधारणपणे ३० कामगार लागतात. शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाचे गाळप झाल्यानंतर गुळाच्या दरानुसार पैसे दिले जातात. ऊस गाळपासाठी किमान २५०० रुपये प्रति टन ते २८०० रुपये प्रति टन असा भाव मिळतो.

  गूळ उद्योग ऑक्टोबर महिन्यात सुरू होतो आणि मे महिन्यात बंद होतो. गुळाची विक्री जालना येथे मोठ्या प्रमाणात केली जाते, तसेच स्थानिक व्यापारीही गूळ उद्योगांमध्ये विक्रीसाठी येतात. मात्र, गुळाला हमी भाव नसल्यामुळे ऊसाच्या दरात चढ-उतार होत असतात, ज्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होतो. या गूळ उद्योगांमुळे स्थानिक तरुणांना रोजगार मिळाल्याने त्यांचे जीवनमान उंचावले असून शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाला योग्य बाजारपेठ मिळाल्याने त्यांचे उत्पन्नही वाढले आहे.


बहुतांश ठिकाणी परराज्यातील मजूर...

  मराठवाड्यातील विविध ठिकाणच्या उद्योगांमध्ये परराज्यातील मजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही ठिकाणी तर उद्योगांवर या मजुरांची मदार असल्याचे दिसून येते.विविध राज्यांतून रोजगाराच्या शोधात आलेले मजूर मराठवाड्यात येऊन साखर उद्योग, गूळ उद्योग, वीटभट्टी, जिनिंग अँड प्रेसिंग, हॉटेल, धाबे या ठिकाणी परराज्यातील मजुरांना त्यांच्या राज्यांमध्ये योग्य रोजगार उपलब्ध नसल्यामुळे ते येऊन काम करत आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, आणि इतर राज्यांमधून येणारे मजूर परिसरातील उद्योगांमध्ये आपले योगदान देत आहेत.

Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!