वास्तव न्यूज मराठी: नवीन वर्षात एक नवा अध्याय आपणही घेऊ शकता सहभाग
आता करूया नव्या स्वप्नांची तयारी, यशाचे दार उघडण्याची हीच वेळ आली भारी
अल्पवधी कालावधीत सर्वसामान्य दर्षकात लोकप्रिय ठरलेल्या वास्तव न्यूज मराठी या लोकप्रिय पत्रकारिता माध्यमाने आपल्या वाचकांसाठी नवीन वर्षात एक अनोखी संधी दिली आहे. आपल्या समाजातील सर्वसामान्यांपासून विविध प्रतिनिधींना आपले विचार व्यक्त करण्याची आणि प्रेरणादायी कहाण्या मांडण्याची संधी मिळणार आहे.
कार्यक्रमाचे ठळक मुद्दे :-
१. प्रतिनिधींचे विचारमंथन: आपले पाहुणे
ग्रामीण पंचायत सरपंचापासून ते आमदारांपर्यंत (आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती, नगराध्यक्ष, ग्रामपंचायत सरपंच) सर्वांना या व्यासपीठावर विचार मांडण्यासाठी आमंत्रित केले जाईल.
२. शेत शिवार
उत्कृष्ट शेतकऱ्यांच्या यशोगाथा सादर करण्यात येतील, ज्यातून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल आणि शेतीसाठी नवे मार्गदर्शन मिळेल.
३. उद्योजकता
यशस्वी उद्योजकांच्या कहाण्या नव्या पिढीला उद्योजकतेबद्दल मार्गदर्शन करतील आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करतील.
४. शिक्षण: माझी शाळा, सुंदर शाळा
या विशेष सदरात शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शाळेच्या विकासाच्या कहाण्या, शाळा व घडलेले विद्यार्थी यांच्या प्रेरणादायी गोष्टी सादर केल्या जातील.
५. गावगाडा
गावातील झालेले विविध विकासकामे, प्रत्यक्षात त्याचा होत असलेला वापर समस्या आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी चर्चासत्रे घेतली जातील.
६. रामराज्य – सुखी कुटुंब
‘माझे कुटुंब, सुखी कुटुंब’ या सदरात कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले जाईल. यात एकत्रित कुटुंब पद्धती त्यातील एकमेकांचा जपत असलेला कुटुंब भाव, त्यातून प्रत्येकाला मिळणारी ऊर्जा, समाधान व होत असलेली प्रगती यांची गाथा.
७. युवा व नारी शक्ती
आपल्या भारतीय संस्कृतीत युवा शक्ती महत्वाची समजल्या जाते. अनेक युवा युवती येत असलेल्या अंनत संकटांवर मात करून आपले अस्तित्त्व, जीवन प्रेरणादायी बनवतात. अशा आदर्शवत प्रावीण्य मिळविलेले आणि संघर्षातून जीवन जगणाऱ्या व आपले नाव कमावलेले व्यक्तींच्या यशोगाथा सादर केल्या जातील.
८. कला क्रीडा
खेळ, क्रीडा आणि विविध कलागुणांत नैपुण्य असणाऱ्या व्यक्तींचे यश दाखवणारे सदर
९. धर्म
धार्मिक श्रद्धा जपत अंधश्रद्धा दूर करणारे, समाजात परिवर्तन करणाऱ्या व्यक्तींसाठी विशेष सदर.
१०. प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता काम करणारे समाजसेवक
समाजसेवा ही एक अशी भावना आहे जी स्वतःसाठी काहीही अपेक्षा न ठेवता समाजाच्या भल्यासाठी सतत कार्य करते. अनेक समाजसेवक आपल्या देशात आणि जगभरात समाजातील गरजूंना मदत करण्यासाठी मोठ्या निष्ठेने कार्य करत असतात. त्यांनी केलेले काम त्यांची प्रसिध्दी किंवा आर्थिक फायद्यासाठी नसून, त्यांच्या अंतःकरणातील दयाळूपणा, मानवतेची भावना आणि समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा यातून प्रेरित असते.
समाजसेवक प्रेरणादायी आहेत कारण त्यांनी समाजाच्या विविध वर्गांतील लोकांसाठी त्यांच्या गरजेनुसार निःस्वार्थपणे सेवा केली आहे. त्यांचे योगदान हे समाजाला अधिक सशक्त, समान आणि प्रेमळ बनवण्यासाठी महत्त्वाचे ठरले आहे.
वरील पैकी कुठल्याही सदरात आपण नैपुण्य मिळवलेले असेल तर आम्ही तुमची सकारात्मक यशोगाथा समजापर्यंत वास्तव न्युज मराठी च्या माध्यमातून घेऊन जाऊ. आपण आपल्या विषय व त्यातील योगदान यातील काही मुद्दे, फोटो आमचा व्हॉट्स ॲप न 8149137114 यावर पाठवावेत यातील काही ठराविक विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करू.
यात मात्र एक महत्त्वाची अट म्हणजे काही विषयात आपण जे काम केले आहे करत आहात यात जास्त वाटा सरकारी योजना, अनुदान यांचा नसावा किमान सुरवातीला तरी.
वास्तव न्यूज मराठीच्या या अभिनव उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आणि आपल्या गावातील, शेतातील किंवा इतर क्षेत्रातील यशोगाथा सादर करण्यासाठी संपर्क साधा
आपल्या प्रेरणादायी गोष्टीतून सकारात्मक बदल घडविण्यासाठी आणि समाजाला प्रेरित करण्यासाठी या संधीचा लाभ घ्या !
Comments
Post a Comment