अंबड घनसावंगी तालुक्यात मागील वर्षी निवडणूकीमुळे ऊस बीलाची रेलचेल यावर्षी मात्र जेमतेम

 अंबड घनसावंगी तालुक्यात मागील वर्षी निवडणूकीमुळे ऊस बीलाची रेलचेल यावर्षी मात्र जेमतेम 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

  अंबड आणि घनसावंगी तालुक्यात मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खूष करण्यासाठी ऊस बिलांची मोठी रक्कम मिळाली होती, मात्र यावर्षी ऊस बिलात जेमतेम रक्कम दिली जात आहे. असा आरोप ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून होत आहे.

मागील वर्षीचे आकडे

समर्थ/सागर सहकारी साखर कारखाना यांनी मागील वर्षी पहिल्या हप्त्याचे बिल २७०० रुपये दिले होते आणि शेवटच्या हप्त्यात ती रक्कम २९०० रुपयांवर पोहोचली होती.

समृद्धी साखर कारखान्याने सुरुवातीला २८०० रुपये दिले आणि शेवटी २९०० रुपये दिले.

ब्ल्यू सफायर यांनी पहिल्या हप्त्यात २७५१ रुपये दिले आणि शेवटच्या हप्त्यात २९५१ रुपयांवर गेले.

यावर्षीची स्थिती

या वर्षी मात्र परिस्थिती बदलली आहे. समर्थ आणि समृद्धी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्याचे बिल केवळ २५०० रुपये दिले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

दुसरीकडे, येडेश्वरी साखर कारखान्याने अंबड घनसावंगी तालुक्यातील ऊस वाहतूक दूर असतानाही शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्यात २७०० रुपये दिले आहेत. मात्र स्थानिक कारखान्यांना वाहतूक जवळ असूनही पहिला हप्ता केवळ २५०० रुपये दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजगी आहे आणि त्यांनी स्थानिक कारखानदारांवर शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप सोशल मीडियावर केला जात आहे.अनेक शेतकरी मागील वर्षीच्या व यावर्षीच्या ऊस बिलांमध्ये असलेल्या तफावतीवर नाराज आहेत.

Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!