जालन्यात दरोडेखोरांनी युवकावर गोळीबार करत केली लूट

 जालन्यात दरोडेखोरांनी युवकावर गोळीबार करत केली लूट


जालन्यातील नागेवाडीजवळ महामार्गावर गुरुवारी रात्री घडलेली घटना, युवक गंभीर जखमी


  जालन्याजवळील नागेवाडी परिसरात गुरुवारी रात्री सुमारे 10.15 वाजता घडलेल्या एका भयंकर घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. दरोडेखोरांनी गावठी पिस्तूलातून गोळीबार करत एका 17 वर्षीय युवकाला लुटले. युवकाला छातीत गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे, आणि सध्या छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

घटना कशी घडली

चंदनझिरा भागातील स्क्रॅप व्यापारी शेख म्रान शेख एजाज हा युवक आपली ब्रेझा कार दुरुस्तीसाठी 2 लाख रुपयांची रक्कम घेऊन संभाजीनगर येथे गेला होता. कार दुरुस्तीनंतर 1 लाख 5 हजार रुपयांचे बिल भरून तो रात्री जालन्याकडे निघाला. नागेवाडी शिवारात असलेल्या गोदामात कार उभी करून, मोटारसायकलने घरी जाण्याच्या तयारीत असताना ही दुर्घटना घडली.

झटापटीत गोळीबार

नागेवाडी परिसरात असलेल्या एका अमृततुल्य चहा हॉटेल'जवळ इम्रान यास तोंडाला काळे रुमाल बांधलेल्या तीन दरोडेखोरांनी पैसे देण्याची धमकी दिली, ने. दरोडेखोरांनी इम्रानला नने विरोध केला. या विरोधामुळे दरोडेखोरांशी जोरदार झटापट झाली. त्याचवेळीएका दरोडेखोराने गावठी पिस्तूलातून इम्रानच्या दिशेने गोळी झाडली. गोळी इम्रानच्या छातीच्या उजव्या बाजूला लागली.


दरोडेखोरीनंतर लूट

 इम्रानला गोळी लागल्यानंतर, दरोडेखोरांनी त्याच्याकडील 95 हजार रुपये हिसकावून पळ काढला. जखमी अवस्थेत असलेल्या इम्रानला त्याच्या नातेवाईकांनी तातडीने संभाजीनगर येथील सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. इम्रानच्या छातीत गोळी अडकलेली असून, ती बाहेर काढण्यासाठी शस्त्रक्रियेची गरज आहे.

पोलिसांची कार्यवाही

घटनेची माहिती मिळताच चंदनझिरापो लीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एम. बी. स्कॉट आणि सहायक फौजदार सय्यद यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संभाजीनगर येथे जाऊन जखमी युवकाचा जबाब नोंदवला. चंदनझिरा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या घटनेने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, आणि पोलिसांनी लवकरात लवकर दरोडेखोरांना अटक करण्यासाठी तपास सुरू केला आहे.

Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!