अंबड येथे लुटमारीची घटना ठरली बनावट; फिर्यादीने वैयक्तिक कारणांमुळे खोटी फिर्याद दिली
अंबड येथे लुटमारीची घटना ठरली बनावट; फिर्यादीने वैयक्तिक कारणांमुळे खोटी फिर्याद दिली
अंबड: पाचोड रोडवर एसबीआय बँकेच्या ग्राहक सेवा केंद्र चालक मयूर वाव्हळ यांनी सकाळी ९:१५ वाजता त्रिमूर्ती कॉम्प्युटरजवळ चाकूचा धाक दाखवत लुटमारी झाल्याची खोटी फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीच्या मते, काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना चाकू दाखवून रोख रक्कम 42,700 रुपये लुटल्याचा दावा केला होता. मात्र, पोलिस तपासातून उघड झाले की ही घटना पूर्णपणे बनावट होती आणि वाव्हळ यांनी वैयक्तिक कारणांमुळे हा बनाव रचला होता. अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.
घटनेच्या तक्रारीनंतर अंबड पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. घटनास्थळाची पाहणी व अन्य पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपास केला. मात्र, लुटमारीचे कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाहीत. संशयास्पद वाटताच पोलिसांनी वाव्हळ यांची चौकशी केली. चौकशीतून उघड झाले की वाव्हळ यांनी आर्थिक अडचणी व वैयक्तिक ताणामुळे या बनावट घटनेची आखणी केली होती. अशी माहिती मिळाली.
अंबड पोलिसांनी वाव्हळ यांना खोटी माहिती दिल्याबद्दल व समाजात घबराट पसरवण्याच्या प्रयत्न केला यानंतर अशी दिशाभूल करणार नाही असे लेखी पत्र मयूर वाव्हळ याने पोलिसांना लिहून दिले.लुटमारीच्या बनावट तक्रारीमुळे पोलिसांची संसाधने व वेळ वाया गेलेली असून, यामुळे भविष्यात अशा घटनांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
पोलिसांचे आवाहन:
अंबड पोलिसांनी नागरिकांना अशा घटनांमध्ये खोट्या तक्रारी दाखल करू नयेत, असे आवाहन केले आहे. खोट्या तक्रारींमुळे समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते, तसेच पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण होतो. कोणतीही समस्या असल्यास योग्य पद्धतीने तक्रारी कराव्यात व पोलिसांना सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. या बनावट तक्रारीमुळे अंबड शहरातील नागरिकांमध्ये चर्चा रंगली असून, भविष्यात अशी कृत्ये टाळण्यासाठी पोलिसांकडून कडक पावले उचलली जाणार आहेत.
Comments
Post a Comment