जालना - सहाय्यक महसूल अधिकारी लाचेच्या जाळ्यात

 जालना - सहाय्यक महसूल अधिकारी लाचेच्या जाळ्यात 


  जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी सापळा कार्यवाही केली. यामध्ये आरोपी लोकसेवक देवानंद कारभारी डोईफोडे, वय ३७ वर्षे, पद - सहायक महासूल अधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय, अंबड येथे कार्यरत असलेल्या व्यक्तीला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. आरोपीने एका तक्रारदाराकडून शासकीय प्रक्रियेसाठी मागितलेली लाच स्वीकारल्याची ही घटना आहे.

तक्रार:

  तक्रारदार, वय २९ वर्षे, राहणार शिंदे वडगांव, तालुका घनसांगवी, जिल्हा जालना यांनी त्यांचे मुलाचे जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी लागणारी ५७ रुपये फी त्यांनी ऑनलाइन पद्धतीने भरली होती. परंतु, आरोपी लोकसेवक देवानंद डोईफोडे यांनी शासकीय प्रक्रियेसाठी अतिरिक्त दोन हजार रुपयांची लाच मागणी केली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली.

सापळा कार्यवाही

  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारदाराच्या तक्रारीनुसार दिनांक ३१ जानेवारी रोजी पडताळणी केली. आरोपीने पंचांच्या समक्ष दोन हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यानंतर आरोपीने तक्रारदाराकडून दोन हजार रुपये स्वीकारले आणि लगेचच पथकाने आरोपीला रंगेहाथ पकडले.

आरोपीकडून मिळालेली संपत्ती

 आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे २००० रुपयांची लाच रकम मिळाली. याशिवाय रोख १०२६५ रुपये व त्याचे जवळील बॅग मध्ये रोख १,६७,५०० रुपये असे एकूण रोख १,७७,७६५ रुपये मिळुन आले. या रकमेबाबत कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण त्याने दिले नाही. त्यामुळे ही रक्कम पुढील तपासासाठी जप्त करण्यात आली आहे.

घरझडती

 आरोपीच्या घराची झडती घेतली असता, घरात कोणतीही आक्षेपार्ह वस्तू मिळाली नाही. घर झडती दरम्यान सर्व प्रक्रिया व्हिडिओ शूटिंगद्वारे नोंदवण्यात आली आहे.

पुढील कारवाई

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच आरोपीला अटक करून त्याचा तपास सुरू करण्यात येणार आहे. आरोपीचा मोबाईल ताब्यात घेऊन त्याच्यावर तपास होणार आहे.

तपास अधिकारी व मार्गदर्शक, कारवाई पथक 

  सापळा कार्यवाहीचे नेतृत्व पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर यांनी केले असून, तपासाच्या मार्गदर्शनासाठी वरिष्ठ अधिकारी संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर आणि मुकुंद आघाव, अप्पर पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळु जाधवर, पोलीस उपअधीक्षक, सापळा पथकातील पो.अं. गजानन खरात, अतीश तिडके, गणेश भुजाडे, गजानन घायवट आदींनी केली

Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!