नव्या वर्षात सर्वच सण पंधरा दिवस लवकर

 नव्या वर्षात सर्वच सण पंधरा दिवस लवकर

गणेशोत्सव ऑगस्टमध्ये : आषाढी आणि मोहरम एकाच दिवशी



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण

  २०२५ या नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे, आणि या वर्षात सणवार मागील वर्षांच्या तुलनेत बारा ते पंधरा दिवस आधी येणार आहेत. यंदा सर्वांच्याच मनात उत्साह निर्माण करणारा गणेशोत्सव सप्टेंबरऐवजी ऑगस्ट महिन्यात साजरा होणार आहे. याशिवाय, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले मोहरम आणि आषाढी एकादशी हे दोन सण एकाच दिवशी येणार आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही सणांच्या तारखांमध्ये बदल झालेला दिसतो. संक्रांत एक दिवस आधी तर महाशिवरात्र ११ दिवस, होळी १० दिवस, गणेशोत्सव १० दिवस, आणि दीपावली तब्बल २१ दिवस आधी आली आहे.


नवीन वर्षातील महत्वाचे सण

 मकर संक्रांत १४ जानेवारी रोजी होती, तर महाशिवरात्र २६ फेब्रुवारीला आहे. होळी १३ मार्चला, रंगपंचमी १९ मार्चला, आणि गुढीपाडवा ३० मार्चला आहे. रमजान ईद ३१ मार्च रोजी साजरी होणार आहे. आषाढी एकादशी आणि मोहरम हे सण ६ जुलै रोजी एकाच दिवशी येणार आहेत. रक्षाबंधन ९ ऑगस्टला, गणेश चतुर्थी २७ ऑगस्टला, अनंत चतुर्दशी ६ सप्टेंबरला, घटस्थापना २२ सप्टेंबरला, आणि दसरा २ ऑक्टोबर रोजी आहे. लक्ष्मी पूजन २१ ऑक्टोबरला, आणि भाऊबीज २३ ऑक्टोबरला साजरी होणार आहे.

  इस्लामिक चंद्र कॅलेंडरनुसार, रमजान महिन्याचे उपवास २ मार्चपासून सुरू होणार आहेत, तर रमजान ईद ३१ मार्चला आहे.


Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!