घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

खाजगी शिकवणी घेणाऱ्याकडून तीन अल्पवयीन मुलीचा विनयभंग

 घनसावंगी खाजगी शिक्षकी पेशाला काळीमा !

खाजगी शिकवणी घेणाऱ्याकडून तीन अल्पवयीन मुलीचा विनयभंग 

पालकांनी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज घनसावंगी तालुक्यात दोन महिन्यातील तिसरी घटना 



घनसावंगी तालुक्यात खाजगी शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर येत असून एका खाजगी शिकवणी (वर्ग) घेणाऱ्या एकाने तीन अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक बाब समोर आली. याप्रकरणी तीर्थपुरी पोलिस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घनसावंगी तालुक्यात जवळपास दोन महिन्यातील ही तिसरी घटना आहे यामुळे पालकांनी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे.

  घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी येथील खाजगी शिकवणी (वर्ग) घेणाऱ्या संशयित आरोपी किशोर तुकाराम आर्दड याने नमुद तारीख वेळी व ठीकाणी यातील पिडीत तीन मुली या यातील आरोपी याचे कडे खाजगी ट्युशनला जातात या आरोपीने मुली ट्युशनला गेल्यावर त्याच्या रखवालीमध्ये असतांना तसेच त्याला कायद्याची जान असतांनाही त्यास वारंवार त्याच्या मनाला व निर्माण होईल असे गैरवर्तन करुन अल्पवयीन लहान मुलींचा विनयभंग केला असे तक्रारीत नमूद केले आहे.

  याप्रकरणी तीर्थपुरी पोलिस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुरनं व कलम-08/2025 कलम 74, 75, 76, 79,351(2) (3) बीएनएस सह कलम 7,8,9 फ(F),9 आय (1)9 एम (M),9 ओ (O),9 पी (P), 10,12 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून घटनास्थळी अंबड चे उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे, सपोनी साजीद अहमद, पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा पठाडे यांनी भेट दिली असून पुढील तपास अंबड चे पोलीस उपनिरीक्षक ए के ढाकणे (नेमणुक पिंक मोबाईल पथक) यांच्याकडे दिला

 दरम्यान घनसावंगी तालुक्यातील ही तिसरी घटना असून काही दिवसापूर्वी घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथेही एका कोचिंग क्लासेस च्या एका संचालकाने क्लास मधील अल्‍पवयीन मुलीवर अत्‍याचार केल्‍याचे समोर आले होते. याबरोबरच विठ्ठल नगर येथेही एका मुलीला जिवे ठार मारण्याची धमकी देत एका ३० वर्षीय तरुणाने मुलींवर अत्याचार केला होता.आता परत राजाटाकळी येथेही ही घटना उघडकीस आलीय. आत्तापर्यंत या दोन महिन्यांतील घनसावंगी तालुक्यात तीन घटना उघडकीस आल्या आहेत यामुळे पालकांनी सतर्क राहण्याची गरज असून आपल्या पाल्य शाळेत, शिकवणी वर्ग या ठिकाणी जात असताना जातीने लक्ष देणे गरजेचे आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या