हॉटेलवर काम करून आपला खर्च भागवून शेतकरी पुत्राची झाली स्टेनोग्राफर पदी निवड

हॉटेलवर काम करून आपला खर्च भागवून शेतकरी पुत्राची झाली स्टेनोग्राफर पदी निवड वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे शिक्षण घेता येत नाही अशी परिस्थिती असताना काही शेतकरी पुत्र मात्र वेळप्रसंगी मजुरीचे काम करून आपले ध्येय गाठताना दिसतात अशीच एका शेतकरी पुत्रांनी वेळप्रसंगी हॉटेलवर काम करून आपल्या शिक्षणाचा खर्च भागवून त्याची स्टेनोग्राफर पदी निवड झाली आहे. अंबड तालुक्यातील भार्डी येथील अल्पभूधारक शेतकरी बाजीराव नखाते यांचा मुलगा शिवाजी नखाते याची मंत्रालय मुंबई येथे स्टेनोग्राफर वर्ग -२ पदावर नुकतीच निवड झाली. हॉटेलवर काम करून आपला खर्च भागवून केले शिक्षण घेतलेय. मागील तीन महिन्यांत त्याने वेगवेगळ्या तीन परिक्षा पास करत यशाला गवसणी घातली आहे. अगोदर मुंबई महानगरपालिकेत स्टेनोग्राफर वर्ग -३, त्यानंतर जालना जिल्हा सत्र न्यायालयात स्टेनोग्राफर वर्ग -३ व आता मंत्रालय मुंबई येथे Higher Grade स्टेनोग्राफर वर्ग -२ पदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे कुठलीही खाजग...