काळ आला होता पण वेळ आली नव्हती एस टी बस पुलावरून नदीत पडता पडता वाचली !
काळ आला होता पण वेळ आली नव्हती एस टी बस पुलावरून नदीत पडता पडता वाचली !
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
अनेवेळा विवीध भयानक अशा घटना घडताना दिसतात काही वेळा काळ आला होता पण वेळ आली नव्हती एस टी बस पुलावरून नदीत पडता पडता वाचली ! अशीच घटना आज ३१ ऑक्टोबर रोजी धाराशिव जिल्ह्यामध्ये घडलीय.
जिल्ह्यातील तेर - ढोकी रस्त्यावरील तेरणा नदीच्या पुलावर आज ३१ ऑक्टोबर रोजी एका राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात होता होता वाचलाय बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस पुलाच्या कठड्याला जोरदार धडकली पण सुदैवाने बस पुलावरून नदीपात्रात कोसळण्यापासून वाचली.
या अपघातात एसटी बस मधील १० ते १७ प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय.
प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार बसचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत बस पुलावरून खाली पडण्यापासून वाचवली. या अपघातामुळे प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून अपघाताची अधिक चौकशी पोलीस करत आहेत.
Comments
Post a Comment