घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
घनसावंगी विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारांच्या जनजागृतीसाठी मतदारसंघातील अनेक गावातील आठवडी बाजारपेठेत २५, २६ ऑक्टोबर रोजी विद्यार्थी शिक्षक यांनी मतदार जनजागृती रॅली काढली.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने स्वीप कार्यक्रम अंतर्गत २५ व २६ऑक्टोबर रोजी १०० घनसावंगी मतदार संघात लोकसभेमध्ये कमी मतदान झालेल्या गावांमध्ये निवडणुकीचे पावित्र्य राखणे तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या उद्देशाने निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा दांडगे, तहसीलदार योगिता खटावकर, पथक प्रमुख गटशिक्षणाधिकारी गोविंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने
गुरु पिंपरी, राणी उंचेगाव, चापडगाव, बोरगाव, रांजणी, तिर्थपुरी बाजार पेठ, भायगव्हाण, बाचेगाव, मुलींचे वस्तीगृहातील शाळेत आणि वडीरामसगांव, तीर्थपुरी येथील आठवडी बाजारपेठेत शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि गावकऱ्यांच्या मदतीने रॅली काढून विशेष जनजागृती अभियान राबविण्यात आले. येथील आठवडी बाजारपेठेत शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि गावकऱ्यांच्या मदतीने रॅली काढून संकल्प पत्राचे वाचन व मतदारांसाठीची शपथ घेऊन विशेष जनजागृती अभियान राबविण्यात आले.
स्वीप पथकातील देवा चीत्राल, प्रा बाळासाहेब वरखडे, डॉ संभाजी मराठे, डॉ बद्रीनाथ भोंगे, राजू आरगडे यांनी मतदारांशी संवाद साधून गावात शंभर टक्के मतदान होण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करून मतदारांशी संवाद साधून गावात शंभर टक्के मतदान होण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.
Comments
Post a Comment