माझी उमेदवारी हे जनतेचे माझ्यावरील प्रेम व विश्र्वास आहे - हिकमत उढाण
माझी उमेदवारी हे जनतेचे माझ्यावरील प्रेम व विश्र्वास आहे - हिकमत उढाण
घोन्सी व बेलवाडी येथील कार्यकर्त्यांचा प्रवेश..
शिवसेना पक्षातर्फे एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याचे पत्रक मिळाले हे माझ्यासाठी केवळ उमेदवारी नाही, तर जनतेचे माझ्यावरचे प्रेम आणि विश्वास आहे, ज्यामुळे मला ही उमेदवारी मिळाली आहे. अशी प्रतिक्रिया हिकमत उढाण यांनी उमेदवारी मिळाल्या नंतर दिलीय.
पुढे बोलतांना उढाण म्हणले की माझे जीवन हे जनतेच्या सेवेसाठी समर्पित आहे. या उमेदवारीमुळे मला तुमच्या समस्या सोडवण्यासाठी अधिक संधी मिळणार आहे. शेतकऱ्यांचे जीवन सुलभ करणे , रोजगार निर्माण करणे, शिक्षणात सुधारणा करणे तसेच इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे मुद्दे घेऊन प्रयत्नशील राहणार आहे.
तुमच्या विकासाचं स्वप्न पूर्ण करणे हेच माझे ध्येय आहे. तुमच्या आशीर्वादाने आणि समर्थनाने अधिक जोमाने तुमच्यासाठी कार्य करण्याचा संकल्प करत आहे असे शेवटी सांगितलेय.
यावेळी मतदरसंघातील घोन्सी व बेलवाडी येथील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment