महाराष्ट्र भरासह जिल्ह्यातील वास्तव व ताज्या घडामोडी व घटना तात्काळ जनते पर्यंत पोहोचवणारे एकमेव ऑनलाईन न्यूज पोर्टल
@ संपादक ओमप्रकाश उढाण मो 8149137114
भाजपाची तीसरी यादी जाहीर...
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
-
भाजपाची तीसरी यादी जाहीर...
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांची तिसऱ्या यादी आज घोषित करण्यात आलीय..
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील सिद्धेश्वर पिंपळगाव येथे २ एप्रिल रोजी एक हृदयद्रावक घटना घडली. संतोष भगवान खरात यांच्या पत्नीने आपल्या दोन चिमुकल्यांसह वारसाच्या गट नंबर १३० मधील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. विवाहिता सविता संतोष खरात (वय २५), मुलगा भावेश संतोष खरात (वय ५) आणि आबा संतोष खरात (वय ३) यांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, सविता खरात यांनी प्रथम आपल्या दोन्ही मुलांना विहिरीत टाकले आणि त्यानंतर स्वतःही विहिरीत उडी घेतली. अशी माहिती मिळतेय. ही दुर्दैवी घटना गावाशेजारील मुसा भद्रायानी नदीवरील तलावाजवळ घडली. संध्याकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली, तेव्हा ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच तिर्थपुरी पोलीस ठाण्याचे सपोनि साजिद अहेमद, पोलिस उपनिरीक्षक प्रतिभा पठाडे, तसेच पोलीस कर्मचारी शिंदे, माळी, पवार, जाधव आणि ग्रहरक्षक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. ...
नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री यांचा कार्यक्रम उधळला..! वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री तथा आमदार राजेश टोपे यांचा जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील दि २३ सप्टेंबर सोमवार रोजीचा कार्यक्रम उधळून लावण्यात आलाय. दरम्यान या घटनेमुळे तीर्थपुरी परिसरासह तालुका भरामध्ये एकच खळबळ उडाली. घनसावंगी तालक्यातील मौजे तीर्थपुरी तालुका घनसावंगी येथे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय इमारत बांधकाम करणे साठी २०.२७ कोटी रुपयाचे उपजील्हा रूग्णायाचा आज २३ सप्टेंबर सोमवार रोजी भूमीपूजन सोहळा माजीमंत्री तथा आमदार राजेश टोपे यांच्या हस्ते आयोजीत केला होता. यावेळी स्थानीक नगर पंचायती मधील नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांना अधिकृत कसलीच माहिती देण्यात आली नाही फक्त उपनगराध्यक्ष यांना काल आमदार राजेश टोपे यांच्या पीए नी फोन करून उद्या कार्यक्रम आहे असे सांगितले. यामुळे तीर्थपुरी नगरपंचायत च्या नगराध्यक्ष, उपनराध्यक्ष व काही नगरसेवकांमध्ये मोठी नाराजी पसरल्याचे दिसून आलेय. यासाठी त्या ठिकाणी मंडप, खुर्च्या, फलक ही ला...
जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..! वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण जालना शहरात धक्कादायक घटना हाती येत असून एका प्रसिद्ध कापड व्यापारी यांनी स्वतःवर गोळी झाडल्याची घटना आज घडलीय. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी आनंत कुलकर्णी, सदर बाजार पोलिस निरीक्षक संदीप भारती यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिलीय. या व्यापाऱ्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजी नगर ला हलवले आहे. जालना शहरातील उद्योजक व व्यापारी अलकेश मधुसूदन बगडीया (वय ५६) यांनी स्वतःवर गोळी झाडलीय यामध्ये गोळी त्यांच्या डोक्याचा चाटून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना नातेवाईकांनी तत्काळ उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.व्यापारी अलकेश बगडीया यांनी कोणत्या कारणावरून स्वतःवर गोळी झाडून घेतली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी आनंत कुलकर्णी, सदर बाजार पोलिस निरीक्षक संदीप भारती यांच्यासह पोलिस अधिक...
Comments
Post a Comment