दिवाळीसाठी सजली झेंडू फुलाची शेती: ऑनलाईनच्या जमान्यातही झेंडू फुलांना मागणी
दिवाळीसाठी सजली झेंडू फुलाची शेती: ऑनलाईनच्या जमान्यातही झेंडू फुलांना मागणी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
दिवाळी सणाची चाहूल लागताच बाजारपेठा सजू लागल्या आहेत, आणि या सणात झेंडू फुलांचे महत्व अतुलनीय आहे. झेंडूची फुले हा सणाच्या सजावटीचा अविभाज्य भाग मानला जातो. या फुलांपासून तयार होणारे आकर्षक हार आणि तोरणं घरांच्या प्रवेशद्वारांवर, देवघरात आणि अंगणात लटकवले जातात, ज्यामुळे घराचे रूप अधिकच सुंदर दिसते. घनसावंगी तालुक्यात दिवाळीसाठी झेंडू फुलाची शेती सजली आहे.
ऑनलाईन शॉपिंग आणि आधुनिक साधनांच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक गोष्टी इंटरनेटवर खरेदी केल्या जात असल्या तरी, झेंडूच्या फुलांची मागणी अजूनही तितकीच जिवंत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात झेंडू फुलांची शेती केली आहे, आणि त्याची विक्री बाजारपेठेत जोरात सुरू आहे. विशेषतः दिवाळी सणासाठी झेंडू फुलांचे आकर्षक हार आणि तोरण तयार केले जात असून, यंदाही त्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
फुलांच्या या रंगीबेरंगी उत्पादनांनी सणाच्या उत्साहात भर घातली आहे. बाजारात आणि स्थानिक फुल विक्रेत्यांकडे लोकांनी झेंडूच्या फुलांची खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. व्यापारीही ग्राहकांच्या आवडीप्रमाणे विविध आकारांचे आणि आकर्षक डिझाइनचे हार-तोरण विक्रीसाठी आणत आहेत. दिवाळीत पारंपारिकतेला महत्त्व असल्यामुळे, झेंडू फुलांची सजावट अजूनही प्रचलित आहे, जी घरांना एक वेगळा सणसाज आणून देते.
प्रतीकिया..
माझ्याकडे एक एकर झेंडू शेती असून यामध्ये वेगवेगळ्या रंगी बेरंगी झाडांची लागवड केलेली आहे यातून मला दसरा सणाला जवळपास एक लाख २० हजार रुपयांचे उत्पन्न झाले होते आता दिवाळीसाठी फुलांचा काय किलो भाव निघतो यावर दिवाळीचे उत्पन्न कळेल.
- महादेव तेलूरे शेतकरी तीर्थपुरी
Comments
Post a Comment