घनसावंगी विधानसभा मतदारसंघात १२ नामनिर्देशन पत्र अवैध..!

 घनसावंगी विधानसभा मतदारसंघात १२ नामनिर्देशन पत्र अवैध..!

८४ पैकी १२ अवैध ७२ वैध 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

  १००- घनसावंगी विधानसभा मतदार संघातून विधानसभा निवडणूकीसाठी आज दिनांक ३० ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी यांचे उपस्थितीत करण्यात आली यात ८४ पैकी १२ नामनिर्देशन पत्र अवैध ठरले असून ७२ नामनिर्देशन पत्र वैध ठरले आहेत.

 यामध्ये कठाळू (बापू) तुकाराम दशरथ, सचिन लक्ष्मण खरात यांचा शपथपत्र अपुर्ण असल्यामुळे आणि मनिषाताई राजेशभैया टोपे यांचा पक्षाचा ए.बी. फॉर्म नसल्यामुळे अवैध ठरविण्यात आलेला आहे. दिनांक २९ ऑक्टोबर रोजी पर्यंत एकूण ८४ नामनिर्देशन पत्र प्राप्त होते, त्यामध्ये १२ नामनिर्देशन अवैध ठरले असून ७२ नामनिर्देशन पत्र वैध आहेत.

सदरील छाननी प्रक्रियेसाठी मनिषा दांडगे, निवडणूक निर्णय अधिकारी, योगिता खटावकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, विजय चव्हाण, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, मोनाली सोनवणे, नायब तहसीलदार घनसावंगी, संतोष इथापे, नायब तहसीलदार, घनसावंगी, कैलास आरगडे, विलास मुळक, विजय पाटील, पी.यू.आवटे, बी.एस.पवार, वाय.बी.सानप, जी.बी.हुलमूख यांनी कामकाज पाहिले. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी, १०० – घनसावंगी विधानसभा मतदार संघ यांनी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!