अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

घनसावंगी विधानसभा १०१ उमेदवारांकडून २०६ नामनिर्देशन पत्र हस्तगत.

 घनसावंगी विधानसभा १०१ उमेदवारांकडून २०६ नामनिर्देशन पत्र हस्तगत.


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

१०० – घनसावंगी विधानसभा मतदार संघातून विधानसभा निवडणूकीसाठी आज दि २८ ऑक्टोबर रोजी पर्यंत १०१ उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्र हस्तगत करण्यात आले आहेत तर दाखल करण्यात आले आहेत. तर २८ उमेदवारांनी एकूण ४० नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. 


आज दिनांक २८ ऑक्टोबर रोजी

1. डॉ.आप्पासाहेब ओंकार कदम – 2 नामनिर्देशन पत्र, 

2. विलास महादेव वाघमारे - 2 नामनिर्देशन पत्र, 

3. असिस्टन्ट प्रोफेसर उढाण सतीश गणपतराव - 1 नामनिर्देशन पत्र, 

4. सिताबाई रामभाऊ मोहिते - 1 नामनिर्देशन पत्र, 

5. रामभाऊ सखाराम मोहिते - 1 नामनिर्देशन पत्र, 

6. चोथे शिवाजीराव कुंडलिकराव - 1 नामनिर्देशन पत्र, 

7. अमजद मगदुममयोद्दिन काजी - 1 नामनिर्देशन पत्र, 

8. रमेश मारोतराव वाघ – 2 नामनिर्देशन पत्र, 

9. कावेरी बळीराम खटके - 2 नामनिर्देशन पत्र, 

10. श्रीहरी यादवराव जगताप - 1 नामनिर्देशन पत्र, 

11. शैलेंद्र शिवाजीराव पवार - 1 नामनिर्देशन पत्र, 

12. श्याम कचरू साळवे - 1 नामनिर्देशन पत्र, 

13. अनिकेत बळीराम खटके - 1 नामनिर्देशन पत्र, 

14. निजाम फकीर शेख - 1 नामनिर्देशन पत्र, 

15. विष्णू तूकाराम खरात - 1 नामनिर्देशन पत्र, 

16. अभिराव सखाराम फोके - 1 नामनिर्देशन पत्र, 

17. सुभाष नानाभाऊ लिहीणार - 1 नामनिर्देशन पत्र, 

18. राजेश अंकुशराव टोपे - 1 नामनिर्देशन पत्र, 

19. ॲड संतोष सुरेश मोरे - 1 नामनिर्देशन पत्र, 

20. बाबासाहेब उत्तमराव शिंदे - 2 नामनिर्देशन पत्र, 

21. ज्ञानेश्वर जगन्नाथ दहिभाते - 1 नामनिर्देशन पत्र, 

22. बाबासाहेब संतुकराव शेळके - 1 नामनिर्देशन पत्र, 

23. सतीष जगन्नाथराव घाटगे - 1 नामनिर्देशन पत्र, 

24. सचिन लक्ष्मण खरात - 1 नामनिर्देशन पत्र 

असे एकूण २९ नामनिर्देशन पत्र दाखल केले असून आज तारखेपर्यंत २८ उमेदवारांनी एकूण ४० नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहे. तसेच आज दिनांक २८ ऑक्टोबर रोजी १८ उमेदवार यांनी २६ नामनिर्देशन पत्र हस्तगत केले असून आज तारखेपर्यंत एकूण १०१ उमेदवारांनी २०६ नामनिर्देशन पत्र हस्तगत केलेली आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी, १०० – घनसावंगी विधानसभा मतदार संघ यांनी दिलीय.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या