घनसावंगी तालुक्यात तीन तरुणांचा एकाच दिवशी मृत्यू !


घनसावंगी तालुक्यात तीन

 तरुणांचा एकाच दिवशी मृत्यू


ऐन दिवाळी सणावर दुःखाचे सावट..


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात आज दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी तीन तरुणांचा एकाच दिवशी दुपारीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय ऐन दिवाळी सणाच्या कालावधीतच या तीन तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे दुःखाचा सावट पसरले. यात दोन जणांचा दिर्घ आजारपणामुळे मृत्यू तर एकाने विषारी द्रव्य सेवन केले होते.

  आज ३१ ऑक्टोबर गुरवार रोजी तालुक्यातील अंतरवाली टेंभी येथील राजु चांदपाशा शेख वय ३७ वर्षे याच्यावर छत्रपती संभाजी नगर येथील दवाखान्यात दुपारी उपचाादरम्यान मृत्यू झाला आहे व रविंद्र लक्ष्मण काटकर वय २८ वर्ष याचा गावातच दिर्घ आजाराने दुपारीच निधन झाले. तर कोठी येथील ज्ञानेश्वर कांता कदम वय ३३ याने दोन दिवसापूर्वी आपल्या घरी विषारी द्रव्य सेवन केले होते त्याला पुढील उपचारांसाठी जालना येथून छत्रपती संभाजी नगर येथे हलविण्यात आले होते परंतु आज दुपारी त्याचा मृत्यू झाला. 

   दरम्यान ऐन दिवाळी सणाच्या कालावधीतच या तीन तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे आंतरवाली टेंभी व कोटी येथे दुःखाचे सावट पसरले आहे.

Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!