नदीत बुडून ३ युवकांचा दुर्दैवी मृत्यू..!
नदीत बुडून ३ युवकांचा दुर्दैवी मृत्यू..!
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील. कन्नड तालुक्यात तीन युवकांचा पूर्णा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल ३० ऑक्टोबर रोजी घडलीय.आवेज नवीद पटेल, अफरोज सिराज पठाण, अल्ताफ राजू पटेल अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत.
कन्नड तालुक्यातील शेलगाव येथे ३० ऑक्टोबर बुधवारी दुपारच्या सुमारास तिघे युवक पोहण्यासाठी नदीत उतरले होते. तिघे गावाजवळील पूर्णा नदीवर पोहण्यासाठी गेले होते. नदीतील सिमेंट बंधाऱ्याच्या खाली उतरून पोहू लागले. पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले आवेज नवीद पटेल वय २१, अफरोज सिराज पठाण वय २३ , अल्ताफ राजू पटेल वय १९ (रा तिघेही शेलगाव) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
त्यांचा आणखी एक मित्र नदीवर आला असता त्याने एकाला कॉल केला. मात्र फोन नदीकाठी काढलेल्या पँटच्या खिशात वाजू लागल्याने ही घटना उघडकीस आलीय ग्रामस्थांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांचा शोध घेतला व मृतदेह बाहेर काढले.
चिंचोली लिंबाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी आणले असता डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले. दरम्यान दिवाळीच्या सणासुदीच्या काळातच ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment