घनसावंगी विधानसभा ३ लाख २४ हजार ७८३ मतदार ठरवणार आमदार !

 घनसावंगी विधानसभा ३ लाख २४ हजार ७८३ मतदार ठरवणार आमदार !

घनसावंगी तालुक्यात १९४, अंबड १०१, जालना ५९ असे ३५४ मतदान केंद्र..

  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   नुकत्याच होणाऱ्या १०० घनसावंगी विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक विभागाकडून तयारी चालु झाली आहे घनसावंगी विधानसभा मतदारसंघात ३ लाख २४ हजार ७८३ मतदार घनसावंगी चा आमदार ठरवणार आहेत. यासाठी घनसावंगी तालुक्यात १९४, अंबड तालुक्यात १०१ तर जालना तालुक्यांत ५९ असे ३५४ मतदान केंद्र आहेत.

  ३ लाख २४ हजार ७८३ मतदारात पुरूष मतदार १ लाख ६८ हजार ६९७, स्त्री मतदार १ लाख ५५ हजार ९५२, सैनिक मतदार १३४ असे आहेत. यासाठी एकूण ३५४ मतदान केंद्र आहेत. तर ३५४ व राखीव ३६ असे एकूण ३८९ पथके स्थापन केली असून यासाठी अधिकारी कर्मचारी यांची नियुक्त करण्यात आली आहे.

   घनसावंगी विधानसभा मतदारसंघात एकुण ३५४ मतदान केंद्र असून त्यापैकी घनसावंगी तालुक्यात १९४, अंबड तालुक्यात १०१ व जालना तालुक्यात ५९ मतदान केंद्र आहेत. सर्व मतदान केंद्रांची क्षेत्रिय अधिकाराऱ्यामार्फत तपासणी करण्यात आली आहे. मतदासंघात पुरुष मतदार १६८६९७, स्त्री मतदार १५५९५२, सैनिक मतदार १३३ अशी एकुण ३२४७८३ मतदार संख्या आहे. घनसावंगी विधानसभा निवडणूकीसाठी ३५४+ ३६ (राखीव) अशा एकुण ३७९ पथके तयार करण्यात आलेली आहेत. मतदान केंद्रनिहाय पथक यांची नियुक्ती करण्यात आली. ३५ क्षेत्रासाठी एकुण ३५ टेबलवर तालुका क्रीडा संकुल, राजेगाव रोड, घनसावंगी येथून साहित्य वाटप करण्यात येणार आहे.

मतदान पुरावा म्हणून...


  मतदान करतांना मतदान ओळखपत्रा शिवाय, पासपोर्ट, वाहन चालक परवाना, सरकारी नोकरीचे ओळखपत्र, राष्ट्रीयकृत बँक/पोस्ट ऑफीस यांनी दिलेले फोटोसह पासबुक, पॅन कार्ड स्मार्ट कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, खासदार आमदार यांना दिलेले शासकीय ओळखपत्र, आधार कार्ड इ. ओळखपत्रे मतदार पुरावे म्हणून ग्राहय धरण्यात येतील.

  सर्व EVM आल्याची खात्री झाल्यानंतर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजेगाव रोड, घनसावंगी येथील स्ट्रॉग रुममध्ये ठेवण्यात येतील. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजेगाव रोड, घनसावंगी येथील स्ट्रॉग रुमकरिता राज्य राखीव पोलीस दलाचा बंदोबस्त प्राप्त झालेला आहे. स्ट्रॉगरुम मध्ये व स्ट्रॉम रुमच्या बाहेर CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.


मतमोजणी  


  दि २३ नोव्हेंबर सकाळी ८ वाजेपासुन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजेगाव रोड, घनसावंगी येथे एकूण १४ टेबलवर, तसेच पोस्टल ३ टेबल व ETPBS चा १ टेबलवर मतमोजणी प्रक्रिया निवडणूक निरीक्षक यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.



निवडणूक कार्यक्रम नियोजित तारखा


- निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक २३ ऑक्टोबर मंगळवार

- नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक २९ ऑक्टोबर मंगळवार

- नामनिर्देशन पत्रांची छाननी दिनांक ऑक्टोबर बुधवार

- उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक ४ नोव्हेंबर सोमवार

- मतदानाचा दिनांक २० नोव्हेंबर बुधवार

- मतमोजणीचा दिनांक २३ नोव्हेंबर शनिवार

- निवडणूक प्रक्रिया पुर्ण करण्याचा दिनांक २५ नोव्हेंबर सोमवार

Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!