घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

जालन्यात तोतया पोलिसांनी वृद्धास मारहाण करून लुटले !

 जालन्यात तोतया पोलिसांनी

 वृद्धास मारहाण करून लुटले


   जालन्यात तोतया पोलिसांनी वृद्धास मारहाण करून लुटल्याची घटना काल घडलीय आष्टी पोलिसांनी पाठलाग करून अवघ्या तासाभरात दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्यात आरोपीच्या ताब्यातून पोलिसांच्या बनावट ओळखपत्रासह मोटारसायकल, धारदार गुप्ती जप्त केलीय.

  परतूर तालुक्यातील हस्तुर तांडा येथील वृद्ध शेतकरी आणिक बुधाजी आढे (वय ६०) हे त्यांच्या मेहुण्यासोबत आष्टी गावाकडे आज सकाळी येत होते. त्यादरम्यान, त्यांना परतूर रोडवरील आश्रमशाळेसमोर मोटारसायकलवरून आलेल्या दोन इसमांनी अडवले. आम्ही पोलीस आहोत, आम्हाला तुमची झडती घ्यायची आहे, असे सांगून दमदाटी करीत त्यांच्याजवळील दोन तोळ्यांच्या सोन्याच्या अंगठ्या आणि खिशातील रोख १ हजार रुपये बळजबरीने हिसकावून घेतले.

   यावेळी त्यांना या पोलिसांनी बेदम मारहाण करीत दुखापत केली. त्यांनतर हे तोतये पोलीस घटनास्थळावरून मोटारसायकलवरून गायब झाले. या घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड यांनी तातडीने फौजफाट्यासह गावाच्या चोहीबाजूने नाकाबंदी केली. 

  त्यादरम्यान, आष्टी येथील एसएसटी पॉईंटजवळ पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या या दोन भामट्यांचा शिताफीने पाठलाग करून पकडले. कडण्यात आलेल्या या भामट्यांची नावे मजलूम उर्फ नवाब रियासद उर्फ यादस अली (वय ३७, रा. बिदर, कर्नाटक) आणि बाकर अली अहमद अली इराणी (वय ३५ रा. परळी) अशी आहेत.

यावेळी आरोपीच्या ताब्यातून एक धारदार गुप्ती, मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. पोलिसांची तीन बनावट ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत. आष्टी पोलीस ठाण्याचे सपोनि. सचिन इंगेवाड आणि त्यांच्या पथकाने अवघ्या तासाभरात सराईत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या