बसचा भीषण अपघात १० जण ठार २० जण गंभीर..!

 बसचा भीषण अपघात १० जण ठार २० जण गंभीर..!



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

  एका खासगी बसचा भीषण अपघात होउन १० जण ठार तर २० जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना आज २० ऑक्टोबर रोजी दुपार च्या सुमारस घडलीय. या खाजगी बसमध्ये ४० प्रवाशी होते.

 सदरील दुर्दैवी घटना राजस्थानच्या सीकरमध्ये घडलीय आज दुपारच्या सूमारास सीकर जिल्ह्याच्या लक्ष्मण गढ परिसरात प्रवाशांनी भरलेली एक खाजगी ताबा सुटल्यामुळे पुलाच्या भिंतीवर जाऊन आदळली. या घटनेत बसचा चक्काचूर झाला असून बसमध्ये ४० प्रवाशी होते यातील १० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे. तसेच २० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

    जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण आलेय या बसमध्ये एकूण ४० प्रवासी होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अपघाताचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून मात्र बस अनियंत्रित होऊन हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

    सीकर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला आहे. प्रत्यक्षदर्शीने या अपघाताबाबत बोलताना सांगितले की बस प्रचंड वेगात होती, अचानक अनियंत्रित झाली आणि पुलाच्या भिंतीला जाऊन धडकली. या अपघातामध्ये १० प्रवाशांचा मृत्यू झालाय तर २० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेत.

    हा अपघात इतका भीषण होता की, अपघातामध्ये बसचा पूर्णपणे चक्काचूर झाला होता. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली.

Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!