Posts

Showing posts from February, 2025

घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

१२ वी परीक्षेत कॉपी;कॉलेजच्या प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल

Image
12 वी परीक्षेतील गैरप्रकार: 17 आरोपींवर गुन्हा दाखल       वैजापूर तालुक्यातील निमगाव येथे कल्पतरु कनिष्ठ महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर 12वी परीक्षेदरम्यान झालेल्या संगणमताच्या घटनेने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ आणि इतर विशिष्ट गैरप्रकार प्रतिबंधक कायदा 1982 अंतर्गत कलम 7 ब 8 अ आणि भारतीय न्याय संहिता कलम 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी:    हेमंत केशव उशीर, वय 35 वर्ष, व्यवसाय गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती, वैजापूर, जि. संभाजीनगर. आरोपींची नावे: 1. अजीनाथ काळे, प्राचार्य,  कल्पतरु कनिष्ठ महाविद्यालय, निमगाव 2. काटे व्हि.एस., पर्यवेक्षक 3. जाधव सी.यु., पर्यवेक्षक 4. गुजाळ एस.बी., पर्यवेक्षक 5. घाटवळे के.के., पर्यवेक्षक 6. खंडीझोड एच.बी., पर्यवेक्षक 7. कुदे जे.डी., पर्यवेक्षक 8. जाधव आर.बी., पर्यवेक्षक 9. श्रीमती पवार व्हि.जी., पर्यवेक्षक 10. डरले जी.एस., पर्यवेक्षक 11. निकम ए.एस., पर्यवेक्षक 12. कुन्दड आर.व्हि., पर्यवेक्षक 13. सोनवणे के.एस., पर्यवेक्षक 14. नराडे आर.बी., सी.सी. 15. आहेर एस.एस., पर्यवेक्षक 16. पवार जी.एस.,...

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर पोलीस शिपायाकडून अत्याचार

Image
  जालना जिल्ह्यात गुन्हा दाखल;पीक मोबाईल पथकाकडे तपास सोपवला         छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका २४ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून जालना जिल्हा पोलीस दलातील एका पोलीस शिपायाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. जालना पोलीस दलात कार्यरत असलेल्या संशयित शिपाई संदीप वसंत सोनवणे (वय २८) याने या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले आणि तिच्यावर दोन महिने शारीरिक अत्याचार केले. असे तक्रारीत नमूद केले आहे. ही घटना पोलीस प्रशासनात धक्का देणारी असल्यामुळे कमालीची गुप्तता बाळगली जात आहे.      शिपाई सोनवणे याने छत्रपती संभाजीनगर येथे नर्सिंग अभ्यासक्रम शिकणाऱ्या या २४ वर्षीय तरुणीला लग्नाचे वचन दिले आणि त्यानुसार ९ ऑक्टोबर २०२४ ते २ डिसेंबर २०२४ या कालावधीत पोलीस क्वार्टर्समध्ये सतत संबंध ठेवले. मात्र, नंतर सोनवणेने दुसऱ्या तरुणीसोबत लग्न ठरवल्याची माहिती त्या तरुणीला मिळताच तिने थेट जालना तालुका पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.     सदर तक्रारीनुसार, जालना पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ६९ अंतर्गत गुन्हा दाखल...

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा एक वर्षानंतर शोध;प्रियकरासह ताब्यात!

Image
  अल्पवयीन मुलीसह प्रियकराला सातारा जिल्ह्यातून अटक; उसतोडीचे काम करीत होते! वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        जुना जालना येथील मोरंडी मोहल्ल्यातून एक वर्षापूर्वी पळवून नेलेल्या 13 वर्षे 6 महिन्याच्या अल्पवयीन मुलीचा शोध अखेर पोलिसांना लागला आहे. पीडित मुलगी तिच्या प्रियकरासह सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील खलकरवाडी येथे ऊसतोडीचे काम करताना सापडली. आरोपी सचिन बाबू गायकवाड (वय 21, रा. कैकाडी मोहल्ला, जुना जालना) याला अल्पवयीन मुलीसह ताब्यात घेण्यात आले आहे.      पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 मार्च 2024 रोजी सचिन गायकवाड याने लग्नाचे आमिष दाखवून पीडित मुलीला फुस लावून पळवून नेले होते. याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, एक वर्ष होऊनही मुलीचा ठावठिकाणा लागला नसल्याने प्रकरण पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटकडे वर्ग केले.      अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने या प्रकरणाचे तांत्रिक विश्लेषण करत आरोपी सचिन गायकवाड याची इत्यंभूत माहिती मिळवली. त्यानुसार, तो त्याच्या अ...

बीड-संतोष देशमुख हत्या प्रकरण: उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

Image
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण          बीड जिल्ह्यातील गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात, महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. या प्रकरणात अ‍ॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.      25 फेब्रुवारी 2025 रोजी, विधी व न्याय विभागाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली. महाराष्ट्र कायदा अधिकारी (नियुक्ती, सेवेच्या अटी आणि मोबदला) नियम, 1984 च्या नियम 44 अंतर्गत ही नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम हे सत्र न्यायालय, कैज, जिल्हा बीड येथे चालवण्यात येणाऱ्या खटल्यांचा सामना करतील. हे खटले C.R. No. 636/2024, C.R. No. 637/2024 आणि C.R. No. 638/2024 या प्रकरणांशी संबंधित आहेत, जे कीज पोलीस स्टेशनच्या हद्दीत दाखल झालेले आहेत.      संतोष देशमुख हत्या प्रकरणातील खटले अत्यंत गंभीर आणि संवेदनशील आहेत, त्यामुळे उज्वल निकम यांच्यासारख्या अनुभवी आणि प्रख्यात वकीलांची नियुक्ती करण्यात आल्याने या प्रकरणातील न्यायप्रक्रिय...

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीला स्थगिती

Image
  राज्य शासनाचा निर्णय     दि. २५ फेब्रुवारी, २०२५, मुंबई - महाराष्ट्र शासनाने जालना आणि बदनापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमास पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. यास कारण ठरले आहे समित्यांच्या विभाजनासंबंधित प्रलंबित न्यायप्रविष्ट प्रकरणे. राज्य शासनाने हा निर्णय उच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या आधारे घेतला आहे.     जालना जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करुन दोन स्वतंत्र बाजार समित्या अस्तित्वात आल्या होत्या - एक जालना आणि दुसरी बदनापूर या ठिकाणी. विभाजनासंबंधीचे आदेश जिल्हा उपनिबंधक, जालना यांनी ६ जून २०२२ रोजी जारी केले होते. त्या पार्श्वभूमीवर, दोन्ही समित्यांच्या निवडणुका घेण्यासाठी ४ फेब्रुवारी २०२५ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.    मात्र, जालना-बदनापूर विभाजनाशी संबंधित प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे आणि त्यात होणाऱ्या संभाव्य गुंतागुंतीला विचारात घेऊन, राज्य शासनाने निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च न्यायालयाने २९ जुलै २०२२ रोजी दिलेल्या निर्देशांचा विचार करून हा निर्...

जालन्यात ग्राम महसूल अधिकारी लाचेच्या जाळ्यात

Image
जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा कार्यवाहीत 2,500 रुपयांची लाच घेणारा अधिकारी रंगेहात पकडला वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण        जालना जिल्ह्यातील पारध येथे आज दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या यशस्वी सापळा कारवाईत ग्राम महसूल अधिकारी अभय कुलकर्णी व खाजगी इसम कृष्णा दळवी यांना रंगेहात पकडण्यात आले. तक्रारदाराने त्यांच्या आईच्या नावाने खरेदी केलेल्या जमिनीचा फेर घेण्यासाठी अर्ज केला होता, त्यासाठी कोणत्याही अधिकृत फीस नसताना 3,000 रुपयांची लाच मागण्यात आली होती. तक्रारीची तपासणी:     तक्रारदाराने जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी तक्रार दिली होती. त्यानंतर आज पारध येथे आरोपीच्या कार्यालयात पडताळणी करण्यात आली. या तपासणीत खाजगी इसम कृष्णा दळवी याने तक्रारदाराकडून 3,000 रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने काही रक्कम कमी करण्याची विनंती केली, परंतु आरोपी कुलकर्णी यांनी 2,500 रुपये स्वीकारण्यास मान्यता दिली. सापळा कारवाई:    सापळा कार्यवाहीत, तक्रारदाराकडून आरोपी क्र. 2 खाजगी इसम क...

गोंदी पोलीस ठाण्यात विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांची भेट

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण    आज दिनांक २४ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी गोंदी पोलीस स्टेशनला वार्षिक तपासणीच्या कामी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी गोंदी पोलिसांच्या मानवंदनेचा स्वीकार करून वर्षभरातील पोलीस स्टेशनच्या कामगिरीचा आढावा घेतला. गोंदी पोलिसांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत त्यांनी पोलिसांचे कौतुक केले. यावेळी, मिश्र यांनी सर्व पोलीस अंमलदारांशी सैनिक संमेलनाच्या माध्यमातून संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी संपूर्ण पोलीस स्टेशन परिसर, इमारत, व सर्व उपलब्ध रेकॉर्डची तपासणी देखील केली.     वार्षिक तपासणीदरम्यान जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड विशाल खांबे, तसेच गोंदी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आशिष खांडेकर आणि गोंदी पोलीस स्टेशनचा सर्व स्टाफ उपस्थित होता.      तपासणी दरम्यान, विशेष पोलीस महानिरीक्षक मिश्र यांनी हद्दीतील सर्व पोलीस पाटलांशी संवाद साधल...

शालेय व्यवस्थापन समितीचा अभिनव उपक्रम:शेतकऱ्यांसाठी किसान कार्ड मोफत

Image
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण   घनसावंगी तालुक्यातील मासेगाव ग्रामपंचायत रोजगार सहाय्यक कृष्णा जनार्धन आनंदे व शालेय व्यवस्थापन समितीच्या संयुक्त विद्यमाने मासेगाव येथील शेतकऱ्यांसाठी एक अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत गावातील शेतकऱ्यांना त्यांचे किसान कार्ड काढून देण्याची सेवा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.    या सेवेसाठी कोणतीही शासकीय किंवा खासगी फी आकारली जाणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना या महत्त्वाच्या कामासाठी आर्थिक ओझं उचलावं लागणार नाही. मात्र, शेतकरी बंधूंना शालेय व्यवस्थापन समितीने एक खास विनंती केली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या स्वेच्छेने जि.प. प्राथमिक शाळा मासेगावच्या शाळा विकास निधी पेटीत दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे दान पूर्णतः ऐच्छिक आहे, परंतु या योगदानाच्या माध्यमातून शाळेच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण सहाय्य मिळेल.   या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किसान कार्डाच्या रूपाने आर्थिक लाभ घेता येणार आहे, तर शाळेला मिळालेल्या दानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नव्या सुविधा निर्माण करता येतील.

घनसावंगी: तीन उपकेंद्रांचा वीज पुरवठा खंडीत, १६ गावातील ग्रामस्थांना पाण्याचा तुटवडा

Image
बाणेगाब, पिंपरखेड, अंतरवाली टेंभी उपकेंद्र बंद  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण     शुक्रवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी सकाळ पासून घनसावंगी येथील १३२ केव्ही सबस्टेशनवरून बणेगाव/पिंपरखेड ३३/११ केव्ही विजेच्या लाईनचा पुरवठा अचानक बंद झाला आहे. या फॉल्टमुळे ३३ केव्ही केबल किट जळून भस्म झाली अशी माहिती मिळाली, त्यामुळे विजेचा पुरवठा २२ पर्यंत ही सुरू होऊ शकला नाही.    यामुळे ३३ केव्ही अंतरवली टेंभी उपकेंद्राचाही पुरवठा बंद आहे. या उपकेंद्रावर पूर्वी तिर्थपूरी लाईनशी जोडलेली होती, परंतु मागील ४- ५ महिन्यांपासून त्या लाईनचा ब्रेकर खराब झाल्यामुळे तो दुरुस्त न करता, अंतरवली टेंभीची लाईन बानेगावच्या लाईनवर जोडण्यात आली होती.   या घडलेल्या फॉल्टमुळे बाणेगाव, पिंपरखेड आणि अंतरवली टेंभी या तीन उपकेंद्रांवर आधारलेली बानेगाव, सौदलगाव, विठ्ठल नगर, लिंगसेवडी मंगरूळ, मुद्रेगाव, कोठी, अंतरवाली टेंभी, पाडुळी, खड्का, खडकावाडी, पिंपरखेड, डोंगरवडी, अरगडे गव्हाण आदी गावासह १५ ते १६ गावं अंधारात आहेत.     विजेअभावी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा देखील थांबला आहे, विजेअभ...

त्या एसटी बस अपघातात एका बालकाचा मृत्यू; मयताची संख्या तीन

Image
  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण    काल २१ फेब्रुवारी रोजी सकाळी जालना जिल्ह्यातील अंबड येथील बस स्थानकावर मोठा अपघात घडला होता. एसटी बस क्रमांक एमएच २० बीएल १६०६ चा ब्रेक फेल झाल्यामुळे बस थेट प्लॅटफॉर्मवर चढली होती.   या दुर्घटनेत काल दोन व्यक्तींना जीव गमवावा लागला तर आज मध्यरात्रीच्या सुमारास एका दोन वर्षीय बालकांची उपचार सुरू असताना मृत्यू झाला अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. या अपघातात आत्तापर्यंत एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताचा तपशील   अंबड बस स्टँडवर अपघाताची घटना घडली तेव्हा बसमध्ये अनेक प्रवासी होते. बस क्रमांक एमएच 20 बीएल 1606 चा ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि ती थेट प्लॅटफॉर्मवर चढली. मृत्यू आणि जखमींची माहिती   या अपघातात उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. मृत व्यक्तींची नावे मुरलीधर काळे (वय ६०) रा शेवगा ता अंबड आणि खलीलउल्ला अजीमुल्लाह शेख (वय ७०) तर रीहान आलीम शेख (वय २ ) रा धाकलगाव ता अंबड अशी आहेत. रीहान शेख या जखमीला नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात दाखल केले होते.    त्याचा २३ फे...

जालन्यात वाळूखाली दबून ५ मजुरांचा जागीच मृत्यू

Image
  दुर्घटनेचा तपशील   जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे मध्यरात्री साडेतीन वाजता दुर्दैवी घटना घडली. वाळूचा टिप्पर पत्र्याच्या शेडजवळ खाली केल्यामुळे पाच मजुरांचा जागीच मृत्यू झाला. अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. या मजुरांनी पुलाजवळ पत्र्याचं शेड उभारून निवास केला होता. बचावकार्य आणि वाचवलेले व्यक्ती  घटनास्थळी पोलिसांनी तत्काळ धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केलं. या घटनेमध्ये एका १३ वर्षीय मुलीला आणि एका महिलेला वाचवण्यात यश आलं. दोघींना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. मध्यरात्री काळाचा घाला   घटनेच्या वेळी सर्व मजूर गाढ झोपेत होते. पुलाचे बांधकाम करणाऱ्या या मजुरांना वाळूखाली दबण्यामुळे जागीच आपले प्राण गमवावे लागले. टिप्परमधून वाळू खाली करण्यात आल्याने पत्र्याच्या शेडजवळील वाळूमध्ये ते दबले. पोलिस तपास सुरू   घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीच्या आधारावर, वाळू टिप्पर खाली केल्यामुळे हा अपघात झाला असल्याचं दिसत आहे. पुढील तपासात अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे. पुलाचे काम आणि मजुरांची स्थिती   पासोडी च...

घनसावंगी विधानसभा मतदार संघात ११८७६ घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण - आ उढाण

Image
  प्रधानमंत्री आवास योजना  वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण    प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घनसावंगी विधानसभा मतदार संघात एकूण ११८७६ घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण करण्यात येणार असल्याची माहिती घनसावंगीचे आमदार हिकमत उढाण यांनी दिली. प्रधानमंत्री आवास योजना मंजुरी व वितरण:    घनसावंगी विधानसभा मतदार संघातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ सन २०२४-२५ मधील लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि पहिला हप्ता वितरणाचा कार्यक्रम राज्यस्तरीय आहे. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत राज्यभरातील १० लाख लाभार्थ्यांना DBT द्वारे पहिला हप्ता वितरीत होणार आहे. घनसावंगी तालुक्यातील मंजुरी व हप्ता वितरण:   घनसावंगी विधानसभा मतदार संघात ११,८७६ घरकुलांचे उदिष्ट आहे, त्यापैकी घनसावंगी तालुक्यातील ८८७६ घरकुलांचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. यापैकी ८१४३ लाभार्थ्यांना घरकुलांसाठी मंजुरी मिळाली आहे, आणि २२/०२/२०२५ रोजी ६४३१ लाभार्थ्यांना पहिला हप्ता DB...

घनसावंगी- दहावीला दोन हजार तीनशे परीक्षार्थी;जालन्याच्या भरारी पथकाची भेट

Image
एकूण नऊ परीक्षा केंद्र ;जालन्याच्या भरारी पथकाची भेट वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण    घनसावंगी तालुक्यात आज पासून (ता २१ फेब्रुवारी) पासून सुरू झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी नऊ परीक्षा केंद्रावर एकूण दोन हजार तीनशे ९३ परीक्षार्थी असून परीक्षा सुरळीत सुरू आहेत काल भरारी पथकातील जालन्याचे शिक्षणाधिकारी  (प्राथमिक) दातखीळ, उपशिक्षणाधिकारी देशमुख, गट शिक्षण अधिकारी रवींद्र जोशी व पर्यवेक्षक एस आर बरडे यांनी तालुक्यातील पानेवाडी परीक्षा केंद्रावर भेट दिली.   तालुक्यातील घनसावंगी येथील कै दादासाहेब देशमुख प्रा शाळा, के दत्तासाहेब देशमुख विद्यालय, महात्मा फुले विद्यालय पानेवाडी, सरस्वती भुवन विद्यालय कुंभार पिंपळगाव, शिवाजी विद्यालय कुंभार पिंपळगाव, मत्स्योदरी विद्यालय तीर्थपुरी, एल एस इंग्लिश स्कूल तीर्थपुरी एसपी पाटील इंग्लिश स्कूल तीर्थपुरी, जिल्हा परिषद प्रा शाळा तीर्थपुरी असे एकूण तालुक्यात नऊ परीक्षा केंद्र आहेत      या परीक्षा केंद्रावर एकूण २३९३ परीक्षार्थी असून आज मराठी पेपरच्या दिवशी एकूण २३७२ परीक्षार्थी हजर होते तर २२ परीक्षार्थी गैरहजर होते...

जालना - एसटी बस अपघात: दोघांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

Image
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण    आज २१ फेब्रुवारी रोजी सकाळी अंबड येथील बस स्थानकावर मोठा अपघात घडला. एसटी बस क्रमांक एमएच 20 बीएल 1606 चा ब्रेक फेल झाल्यामुळे बस थेट प्लॅटफॉर्मवर चढली. या दुर्घटनेत दोन व्यक्तींना जीव गमवावा लागला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. अपघाताचा तपशील:   अंबड बस स्टँडवर अपघाताची घटना घडली तेव्हा बसमध्ये अनेक प्रवासी होते. बस क्रमांक एमएच 20 बीएल 1606 चा ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि ती थेट प्लॅटफॉर्मवर चढली. मृत्यू आणि जखमींची माहिती:   या अपघातात जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. मृत व्यक्तींची नावे मुरलीधर आनंदराव काळे (वय ६०) रा शेवगा ता अंबड जी जालना आणि खलीलउल्ला अजीमुल्लाह शेख (वय ७०) अशी आहेत. याशिवाय रेहान शेख या जखमीला त्याच्या नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. दोन अन्य जखमींवर जालना जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुरलीधर काळे  रुग्णालयातील उपचार आणि प्रकृती:  जखमींना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उ...

जालन्यात एसटीचे ब्रेक फेल झाल्याने थेट प्लॅटफॉर्मवर चढली !

Image
सुदैवाने हानी टळली ! चार ते पाच जण जखमी वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण   आज सकाळी अंबड बस स्टँड येथे एक अपघात घडला. यात गाडी क्रमांक एमएच 20 बीएल 1606 या गाडीचा ब्रेक फेल झाल्याने गाडी थेट प्लॅटफॉर्मवर चढली. प्राथमिक माहिती नुसार, या घटनेत चार ते पाच जण जखमी झाले आहेत. अशी माहिती मिळाली.   मिळालेल्या माहितीनुसार अपघाताच्या वेळी बसमध्ये अनेक प्रवासी होते, मात्र सुदैवाने मोठा अपघात टळला. जखमींना तत्काळ जालना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले आहे.   गाडीचा चालकाचे नाव राठोड असल्याचे समजते. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती या अपघातानंतर गाडीची तांत्रिक तपासणी केली जाणार असून, या घटनेच्या कारणांची चौकशी सुरू करण्यात येणार आहे. गाडीच्या ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाला असल्याचे समजले असले तरी, याविषयी अधिक तपास सुरू आहे.

जालन्यात पहिल्याच दिवशी दहावीच्या पेपर फुटीची घटना

Image
प्रश्नपत्रिका बाहेर, उत्तरपत्रिकांचे झेरॉक्स विद्यार्थ्यांना पुरवले   जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील एका परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षेत पेपर फुटीची धक्कादायक घटना घडली आहे. राज्यभरात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) वतीने इयत्ता दहावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सुरुवात झाली. या परीक्षेला १६ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले आहेत, आणि पहिलाच पेपर म्हणजे मराठी विषयाचा होता. मात्र, अवघ्या काही मिनिटांतच बदनापूर येथे प्रश्नपत्रिका बाहेर आल्याचे समोर आले आहे. घटनाक्रम:   आज सकाळी ११ वाजता परीक्षेला सुरुवात झाल्यानंतर काहीच वेळात मराठी विषयाची प्रश्नपत्रिका बदनापूर येथील एका परीक्षा केंद्राच्या बाहेर आल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, परीक्षा सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच प्रश्नपत्रिका बाहेर आल्याचे समजते. हे पेपर शहरातील झेरॉक्स सेंटरवर पोहोचवून, तेथून थेट उत्तरपत्रिकांचे झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना पुरवले जात होते. असे समजते ही माहिती कळताच परीक्षेच्या सुरक्षेबाबतच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. खळबळजनक प्रकार: ...

तलाठी कार्यालयात खाजगी व्यक्तींचा सहभाग: महाराष्ट्र शासनाने दिल्या कडक सूचना

Image
महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक: तलाठ्यांच्या खाजगी व्यक्तींना कामावर ठेवण्याच्या प्रकरणात कडक कारवाईचे आदेश वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण    महाराष्ट्र शासनाने तलाठी कार्यालयांमध्ये खाजगी व्यक्तींचा सहभाग आणि खाजगी कार्यालयांचा वापर याबाबत कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शासनाने दिनांक १९ डिसेंबर २०२४ रोजी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना या संदर्भात परिपत्रक जारी केले आहे. तलाठ्यांनी खाजगी व्यक्तींना कामावर ठेवू नये, असे या परिपत्रकात स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या परिपत्रकाच्या आधारे तलाठी कार्यालयात होणाऱ्या गैरव्यवहारांवर आळा घालण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. तलाठ्यांच्या खाजगी मदतनीसांवर शिस्तभंगाची कारवाई होणार   शासनाच्या परिपत्रकानुसार, तलाठी कार्यालयांमध्ये खाजगी व्यक्तींना शासकीय कामकाजासाठी नेमणे हे शासनाच्या नियमांचे सरळ उल्लंघन आहे. अशा प्रकरणांमध्ये म.ना.से . (शिस्त व अपील) नियम, १९७९ नुसार कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. तलाठ्यांनी शासनाच्या जागेवरच शासकीय कामकाज करणे आवश्यक आहे, खाजगी जागेतून किंवा खाजगी मदतनीसांच्या सहाय्याने ...

अंबड पोलीस ठाण्याची मोठी कामगिरी: प्रो. रेडद्वारे पाच लाखाचा मुद्देमाल जप्त

Image
पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारसह अवैध दारू वाहतूक करणारे इसम अटक   अंबड पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 20/02/2025 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे एक मोठी कारवाई पार पडली. आयपीएस सिद्धार्थ बारवाल यांनी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ सुत्रे हलवली असता पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये अवैधरित्या देशी व विदेशी दारूची विक्री करण्यासाठी जात असलेला एक इसम पोलिसांच्या हाती लागला. सहा. पोलीस निरीक्षक अमोल गुरले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संशयित कार अडवून तिची तपासणी केली असता 24,440/- रुपये किमतीची देशी व विदेशी दारू, तसेच आरोपीच्या अंगझडतीत 46,200/- रुपये रोख मिळाले. त्याचप्रमाणे 4,00,000/- रुपये किमतीची स्विफ्ट कार जप्त करण्यात आली.   छोटा हत्ती वाहनातून पाणी बॉटलच्या बॉक्सखाली लपवून विदेशी दारूची तस्करी      सदर घटनेत आणखी एक मोठी कारवाई आयपीएस सिद्धार्थ बारवाल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. त्यांनी विदेशी दारूची तस्करी करणाऱ्या छोटा हत्ती वाहन (क्र. एमएच-21, एक्स-5305) चा पाठलाग करून वाहन जप्त केले. वाहनात पाण्याच्या बॉटलच्या बॉक्सखाली लपवून ठेवलेले 13 बॉक्स विदेशी...

भगवंतावर विश्वास आणि श्रद्धा हवी, तरच भगवंताची भक्ती साधता येते - हभप साध्वी रुक्मीणीताई हांवरे

Image
  तीर्थपुरी येथील लक्ष्मी नारायण मंदिरात शिवमहापुराण कथा वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      भगवंतावर विश्वास आणि श्रद्धा हवी, तरच भगवंताची भक्ती साधता येईल असे हभप साध्वी रुक्मीणीताई हांवरे यांनी कथेप्रसंगी सांगितले. त्या घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील लक्ष्मी नारायण मंदिरात संगीतमय शिवमहापुराण कथेवेळी काल बुधवारी बोलत होत्या.    पुढे हभप साध्वी रुक्मीणीताई हांवरे यांनी आपल्या कथेत त्यांनी समुद्र स्नानाचे महत्त्व पटवून दिले आणि सांगितले की, "समुद्र स्नान केल्याने सर्व जगातील पापे धुतली जातात." या प्रसंगी साध्वींनी संत तुकाराम महाराजांच्या ओवीचा संदर्भ देत म्हटले, "तुका म्हणे गंगासागर, अवघे एक उर्मिसागर."     कथेच्या माध्यमातून साध्वी रुक्मीणीताईंनी कर्माच्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी स्पष्ट केले की, "मानव देह मिळणे हे मोठे भाग्य आहे. ज्या मनुष्याला मानव देह मिळाला आहे, त्याने चांगले कर्म केले तर त्याला चांगली फळे मिळतात. मात्र वाईट कर्म केल्यास वाईट फळे मिळतात. मानव देह प्राप्त झाला आहे, त्यामुळे चांगले कर्म करा आणि शिवलोकाची प्राप्ती मिळवा....

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या