घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा एक वर्षानंतर शोध;प्रियकरासह ताब्यात!

 अल्पवयीन मुलीसह प्रियकराला सातारा जिल्ह्यातून अटक; उसतोडीचे काम करीत होते!



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 


     जुना जालना येथील मोरंडी मोहल्ल्यातून एक वर्षापूर्वी पळवून नेलेल्या 13 वर्षे 6 महिन्याच्या अल्पवयीन मुलीचा शोध अखेर पोलिसांना लागला आहे. पीडित मुलगी तिच्या प्रियकरासह सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील खलकरवाडी येथे ऊसतोडीचे काम करताना सापडली. आरोपी सचिन बाबू गायकवाड (वय 21, रा. कैकाडी मोहल्ला, जुना जालना) याला अल्पवयीन मुलीसह ताब्यात घेण्यात आले आहे.

     पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 मार्च 2024 रोजी सचिन गायकवाड याने लग्नाचे आमिष दाखवून पीडित मुलीला फुस लावून पळवून नेले होते. याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, एक वर्ष होऊनही मुलीचा ठावठिकाणा लागला नसल्याने प्रकरण पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटकडे वर्ग केले.

     अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने या प्रकरणाचे तांत्रिक विश्लेषण करत आरोपी सचिन गायकवाड याची इत्यंभूत माहिती मिळवली. त्यानुसार, तो त्याच्या अल्पवयीन प्रेयसीसोबत सातारा जिल्ह्यातील खलकरवाडी शिवारात ऊसतोडणीचे काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. लगेचच पोलीस पथक खलकरवाडी शिवारात पोहोचले आणि आरोपीला मुलीसह ताब्यात घेतले.

   सदर प्रकरणात मुलीला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपी सचिन गायकवाडला जालना येथे आणून कदीम जालना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

       ही कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटच्या पोलीस उपनिरीक्षक प्रियंका तुपे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र जोशी, सहायक फौजदार संजय गवळी, पोहेकॉं. सागर बावस्कर, महिला अंमलदार पुष्पा खरटमल, संगीता चव्हाण, आरती साबळे, रेणुका राठोड आणि चालक संजय कुलकर्णी यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली.

    सदर प्रकरणामुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेबाबत जनजागृती होण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या