घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
शुक्रवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी सकाळ पासून घनसावंगी येथील १३२ केव्ही सबस्टेशनवरून बणेगाव/पिंपरखेड ३३/११ केव्ही विजेच्या लाईनचा पुरवठा अचानक बंद झाला आहे. या फॉल्टमुळे ३३ केव्ही केबल किट जळून भस्म झाली अशी माहिती मिळाली, त्यामुळे विजेचा पुरवठा २२ पर्यंत ही सुरू होऊ शकला नाही.
यामुळे ३३ केव्ही अंतरवली टेंभी उपकेंद्राचाही पुरवठा बंद आहे. या उपकेंद्रावर पूर्वी तिर्थपूरी लाईनशी जोडलेली होती, परंतु मागील ४- ५ महिन्यांपासून त्या लाईनचा ब्रेकर खराब झाल्यामुळे तो दुरुस्त न करता, अंतरवली टेंभीची लाईन बानेगावच्या लाईनवर जोडण्यात आली होती.
या घडलेल्या फॉल्टमुळे बाणेगाव, पिंपरखेड आणि अंतरवली टेंभी या तीन उपकेंद्रांवर आधारलेली बानेगाव, सौदलगाव, विठ्ठल नगर, लिंगसेवडी मंगरूळ, मुद्रेगाव, कोठी, अंतरवाली टेंभी, पाडुळी, खड्का, खडकावाडी, पिंपरखेड, डोंगरवडी, अरगडे गव्हाण आदी गावासह १५ ते १६ गावं अंधारात आहेत.
विजेअभावी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा देखील थांबला आहे, विजेअभावी पिण्याचे पाणी पुरवठा करणारी यंत्रणा बंद पडल्यामुळे गावांमध्ये पाण्याचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. विशेषतः ऊसतोडणी कामगार आणि ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे हाल सुरू आहेत. सध्या सुरू असलेली गरमीची लाट परिस्थितीला आणखी बिकट बनवत आहे. कालपासून ग्रामस्थांना प्यायला पाणी उपलब्ध नसल्याने फिल्टरवर मोठी गर्दी होत आहे.
गावकऱ्यांनी या परिस्थितीत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली असून प्रशासनाकडून याबाबत त्वरित विजपुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी होत आहे
या फॉल्टमुळे जवळपास १५- १६ गावांमध्ये विजेअभावी पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असून, ग्रामस्थांसह ऊसतोडणी मजूर या परिस्थितीत अडचणीत सापडले आहेत. २१ फेब्रुवारी सकाळी खंडित झालेला विजपुरवठा आज दि २२ रोजी ५:१५ वाजेला म्हणजेच ३१ तासानंतर सुरळीत करण्यात आला.
Comments
Post a Comment