घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
भगवंतावर विश्वास आणि श्रद्धा हवी, तरच भगवंताची भक्ती साधता येईल असे हभप साध्वी रुक्मीणीताई हांवरे यांनी कथेप्रसंगी सांगितले. त्या घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील लक्ष्मी नारायण मंदिरात संगीतमय शिवमहापुराण कथेवेळी काल बुधवारी बोलत होत्या.
पुढे हभप साध्वी रुक्मीणीताई हांवरे यांनी आपल्या कथेत त्यांनी समुद्र स्नानाचे महत्त्व पटवून दिले आणि सांगितले की, "समुद्र स्नान केल्याने सर्व जगातील पापे धुतली जातात." या प्रसंगी साध्वींनी संत तुकाराम महाराजांच्या ओवीचा संदर्भ देत म्हटले, "तुका म्हणे गंगासागर, अवघे एक उर्मिसागर."
कथेच्या माध्यमातून साध्वी रुक्मीणीताईंनी कर्माच्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी स्पष्ट केले की, "मानव देह मिळणे हे मोठे भाग्य आहे. ज्या मनुष्याला मानव देह मिळाला आहे, त्याने चांगले कर्म केले तर त्याला चांगली फळे मिळतात. मात्र वाईट कर्म केल्यास वाईट फळे मिळतात. मानव देह प्राप्त झाला आहे, त्यामुळे चांगले कर्म करा आणि शिवलोकाची प्राप्ती मिळवा. वाईट कर्म केल्यास नरक यातना भोगाव्या लागतात."
शिवमहापुराण कथेचे श्रवण केल्याने सर्व पापांचा नाश होतो, असे सांगताना त्यांनी म्हटले, "जो शिवमहापुराण कथा श्रवण करतो, त्याच्या सर्व जन्मजन्मांतील व्यथांचे निवारण होते." या प्रवचनात साध्वींनी भक्तीच्या मार्गावर श्रद्धा आणि स्वच्छतेचे महत्त्वही अधोरेखित केले. "देवाजवळ अस्वच्छता नसायला हवी, स्वच्छता राखली पाहिजे. भगवंतावर विश्वास आणि श्रद्धा हवी, तरच भगवंताची भक्ती साधता येईल," असे त्यांनी सांगितले.
कथेच्या माध्यमातून आलेल्या श्रोत्यांना आध्यात्मिक उन्नतीचा संदेश मिळाला, आणि या संगीतमय कथेने भक्तांना भक्तीमय वातावरणाचा अनुभव दिला.
Comments
Post a Comment