घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

जालन्यात पहिल्याच दिवशी दहावीच्या पेपर फुटीची घटना

प्रश्नपत्रिका बाहेर, उत्तरपत्रिकांचे झेरॉक्स विद्यार्थ्यांना पुरवले



  जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील एका परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षेत पेपर फुटीची धक्कादायक घटना घडली आहे. राज्यभरात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) वतीने इयत्ता दहावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सुरुवात झाली. या परीक्षेला १६ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले आहेत, आणि पहिलाच पेपर म्हणजे मराठी विषयाचा होता. मात्र, अवघ्या काही मिनिटांतच बदनापूर येथे प्रश्नपत्रिका बाहेर आल्याचे समोर आले आहे.


घटनाक्रम:


  आज सकाळी ११ वाजता परीक्षेला सुरुवात झाल्यानंतर काहीच वेळात मराठी विषयाची प्रश्नपत्रिका बदनापूर येथील एका परीक्षा केंद्राच्या बाहेर आल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, परीक्षा सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच प्रश्नपत्रिका बाहेर आल्याचे समजते. हे पेपर शहरातील झेरॉक्स सेंटरवर पोहोचवून, तेथून थेट उत्तरपत्रिकांचे झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना पुरवले जात होते. असे समजते ही माहिती कळताच परीक्षेच्या सुरक्षेबाबतच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


खळबळजनक प्रकार:


  परीक्षेच्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेच्या दाव्यानंतर देखील अशा घटना समोर येणे खूपच गंभीर मानले जात आहे. राज्यभरातील परीक्षांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही घटना आहे. बदनापूरमधील झेरॉक्स सेंटरवर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका पुरवली जात असल्याने परीक्षेचे भविष्य धोक्यात आले आहे.

  या घटनेमुळे जालना जिल्ह्यातील परीक्षेच्या व्यवस्थापनावर संशय व्यक्त होऊ लागला आहे. या पेपर फुटीच्या घटनेमुळे आता राज्यभरात खळबळ उडाली आहे. 


दहावीचा मराठीचा पेपर फुटला नाही - जिल्हाधिकारी 

  आज काही वृत्त वाहिन्यानी ‘जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात दहावीचा मराठी विषयाचा पेपर फुटला’ या आशयाचे चूकीचे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. परंतू प्रत्यक्षात असा कोणताही प्रकार घडलेला नसुन, स्थानिक झेरॉक्स दूकानदारांनी आजच्या मराठी विषयाच्या प्रश्न पत्रिकेत न आलेल्या प्रश्नांची झेरॉक्स काढून विक्री केली आहे. प्रश्न पत्रिका परिक्षा केंद्राच्या बाहेर आलेली नाही. तथापी याठिकाणी दगडफेक झाली. याबाबत दोषीं व्यक्तीचा शोध घेवून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी कळविले आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या