अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

त्या एसटी बस अपघातात एका बालकाचा मृत्यू; मयताची संख्या तीन

 



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

  काल २१ फेब्रुवारी रोजी सकाळी जालना जिल्ह्यातील अंबड येथील बस स्थानकावर मोठा अपघात घडला होता. एसटी बस क्रमांक एमएच २० बीएल १६०६ चा ब्रेक फेल झाल्यामुळे बस थेट प्लॅटफॉर्मवर चढली होती.

  या दुर्घटनेत काल दोन व्यक्तींना जीव गमवावा लागला तर आज मध्यरात्रीच्या सुमारास एका दोन वर्षीय बालकांची उपचार सुरू असताना मृत्यू झाला अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. या अपघातात आत्तापर्यंत एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे.


अपघाताचा तपशील

  अंबड बस स्टँडवर अपघाताची घटना घडली तेव्हा बसमध्ये अनेक प्रवासी होते. बस क्रमांक एमएच 20 बीएल 1606 चा ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि ती थेट प्लॅटफॉर्मवर चढली.


मृत्यू आणि जखमींची माहिती

  या अपघातात उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. मृत व्यक्तींची नावे मुरलीधर काळे (वय ६०) रा शेवगा ता अंबड आणि खलीलउल्ला अजीमुल्लाह शेख (वय ७०) तर रीहान आलीम शेख (वय २ ) रा धाकलगाव ता अंबड अशी आहेत. रीहान शेख या जखमीला नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात दाखल केले होते. 


  त्याचा २३ फेब्रुवारी रोजी दीड वाजता मृत्यू झाला. अशी माहिती फेरोज पठाण यांनी दिली.तसेच त्याची आई हीना आलीम शेख यांचे हाथ फैक्चर झालेला आसुन जालना येथील रुग्णालय मध्ये उपचार चालु आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या