घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
घनसावंगी तालुक्यातील मासेगाव ग्रामपंचायत रोजगार सहाय्यक कृष्णा जनार्धन आनंदे व शालेय व्यवस्थापन समितीच्या संयुक्त विद्यमाने मासेगाव येथील शेतकऱ्यांसाठी एक अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत गावातील शेतकऱ्यांना त्यांचे किसान कार्ड काढून देण्याची सेवा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या सेवेसाठी कोणतीही शासकीय किंवा खासगी फी आकारली जाणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना या महत्त्वाच्या कामासाठी आर्थिक ओझं उचलावं लागणार नाही. मात्र, शेतकरी बंधूंना शालेय व्यवस्थापन समितीने एक खास विनंती केली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या स्वेच्छेने जि.प. प्राथमिक शाळा मासेगावच्या शाळा विकास निधी पेटीत दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे दान पूर्णतः ऐच्छिक आहे, परंतु या योगदानाच्या माध्यमातून शाळेच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण सहाय्य मिळेल.
या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किसान कार्डाच्या रूपाने आर्थिक लाभ घेता येणार आहे, तर शाळेला मिळालेल्या दानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नव्या सुविधा निर्माण करता येतील.
Comments
Post a Comment