घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

१२ वी परीक्षेत कॉपी;कॉलेजच्या प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल

12 वी परीक्षेतील गैरप्रकार: 17 आरोपींवर गुन्हा दाखल



      वैजापूर तालुक्यातील निमगाव येथे कल्पतरु कनिष्ठ महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर 12वी परीक्षेदरम्यान झालेल्या संगणमताच्या घटनेने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ आणि इतर विशिष्ट गैरप्रकार प्रतिबंधक कायदा 1982 अंतर्गत कलम 7 ब 8 अ आणि भारतीय न्याय संहिता कलम 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिर्यादी: 

  हेमंत केशव उशीर, वय 35 वर्ष, व्यवसाय गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती, वैजापूर, जि. संभाजीनगर.


आरोपींची नावे:

1. अजीनाथ काळे, प्राचार्य, 

कल्पतरु कनिष्ठ महाविद्यालय, निमगाव

2. काटे व्हि.एस., पर्यवेक्षक

3. जाधव सी.यु., पर्यवेक्षक

4. गुजाळ एस.बी., पर्यवेक्षक

5. घाटवळे के.के., पर्यवेक्षक

6. खंडीझोड एच.बी., पर्यवेक्षक

7. कुदे जे.डी., पर्यवेक्षक

8. जाधव आर.बी., पर्यवेक्षक

9. श्रीमती पवार व्हि.जी., पर्यवेक्षक

10. डरले जी.एस., पर्यवेक्षक

11. निकम ए.एस., पर्यवेक्षक

12. कुन्दड आर.व्हि., पर्यवेक्षक

13. सोनवणे के.एस., पर्यवेक्षक

14. नराडे आर.बी., सी.सी.

15. आहेर एस.एस., पर्यवेक्षक

16. पवार जी.एस., अध्यक्ष

17. श्रीमती वैशाली पवार, सचिव,

कल्पतरु कनिष्ठ महाविद्यालय, निमगाव


  घटना: 

   दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12:35 वाजता, निमगाव येथील कल्पतरु कनिष्ठ महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर आरोपींनी संगणमत करून विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास सहकार्य केल्याचे आढळले. या प्रकारामुळे परीक्षा कर्तव्यात मोठ्या प्रमाणात कसूर झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

गुन्हा नोंद:

   दि. 27 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 7:13 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी पोउपनि ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या