घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
घनसावंगी तालुक्यात आज पासून (ता २१ फेब्रुवारी) पासून सुरू झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी नऊ परीक्षा केंद्रावर एकूण दोन हजार तीनशे ९३ परीक्षार्थी असून परीक्षा सुरळीत सुरू आहेत काल भरारी पथकातील जालन्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दातखीळ, उपशिक्षणाधिकारी देशमुख, गट शिक्षण अधिकारी रवींद्र जोशी व पर्यवेक्षक एस आर बरडे यांनी तालुक्यातील पानेवाडी परीक्षा केंद्रावर भेट दिली.
तालुक्यातील घनसावंगी येथील कै दादासाहेब देशमुख प्रा शाळा, के दत्तासाहेब देशमुख विद्यालय, महात्मा फुले विद्यालय पानेवाडी, सरस्वती भुवन विद्यालय कुंभार पिंपळगाव, शिवाजी विद्यालय कुंभार पिंपळगाव, मत्स्योदरी विद्यालय तीर्थपुरी, एल एस इंग्लिश स्कूल तीर्थपुरी एसपी पाटील इंग्लिश स्कूल तीर्थपुरी, जिल्हा परिषद प्रा शाळा तीर्थपुरी असे एकूण तालुक्यात नऊ परीक्षा केंद्र आहेत
या परीक्षा केंद्रावर एकूण २३९३ परीक्षार्थी असून आज मराठी पेपरच्या दिवशी एकूण २३७२ परीक्षार्थी हजर होते तर २२ परीक्षार्थी गैरहजर होते. या नऊ परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक, सहसंचालक तसेच सहाय्यक परिवेक्षक व बैठे पथक नियुक्त करण्यात आले आहेत. कॉपीमुक्त अभियानासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, गटशिक्षणाधिकारी कार्यालय यांचे अधिकारी कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
तीर्थपुरी येथील मत्स्योदरी विद्यालय येथील परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत चालू असून गेट बाहेरील पोलिस बंदोबस्त
Comments
Post a Comment