घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
दि. २५ फेब्रुवारी, २०२५, मुंबई - महाराष्ट्र शासनाने जालना आणि बदनापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमास पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. यास कारण ठरले आहे समित्यांच्या विभाजनासंबंधित प्रलंबित न्यायप्रविष्ट प्रकरणे. राज्य शासनाने हा निर्णय उच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या आधारे घेतला आहे.
जालना जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करुन दोन स्वतंत्र बाजार समित्या अस्तित्वात आल्या होत्या - एक जालना आणि दुसरी बदनापूर या ठिकाणी. विभाजनासंबंधीचे आदेश जिल्हा उपनिबंधक, जालना यांनी ६ जून २०२२ रोजी जारी केले होते. त्या पार्श्वभूमीवर, दोन्ही समित्यांच्या निवडणुका घेण्यासाठी ४ फेब्रुवारी २०२५ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.
मात्र, जालना-बदनापूर विभाजनाशी संबंधित प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे आणि त्यात होणाऱ्या संभाव्य गुंतागुंतीला विचारात घेऊन, राज्य शासनाने निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च न्यायालयाने २९ जुलै २०२२ रोजी दिलेल्या निर्देशांचा विचार करून हा निर्णय घेतला गेला आहे.
Comments
Post a Comment