अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

जालना - एसटी बस अपघात: दोघांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

  आज २१ फेब्रुवारी रोजी सकाळी अंबड येथील बस स्थानकावर मोठा अपघात घडला. एसटी बस क्रमांक एमएच 20 बीएल 1606 चा ब्रेक फेल झाल्यामुळे बस थेट प्लॅटफॉर्मवर चढली. या दुर्घटनेत दोन व्यक्तींना जीव गमवावा लागला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.


अपघाताचा तपशील:

  अंबड बस स्टँडवर अपघाताची घटना घडली तेव्हा बसमध्ये अनेक प्रवासी होते. बस क्रमांक एमएच 20 बीएल 1606 चा ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि ती थेट प्लॅटफॉर्मवर चढली.


मृत्यू आणि जखमींची माहिती:

  या अपघातात जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. मृत व्यक्तींची नावे मुरलीधर आनंदराव काळे (वय ६०) रा शेवगा ता अंबड जी जालना आणि खलीलउल्ला अजीमुल्लाह शेख (वय ७०) अशी आहेत. याशिवाय रेहान शेख या जखमीला त्याच्या नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. दोन अन्य जखमींवर जालना जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुरलीधर काळे 

रुग्णालयातील उपचार आणि प्रकृती:

 जखमींना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले आहे.


चालकाची माहिती आणि तपास:

  गाडीचा चालक व्हीएस राठोड असल्याचे समजते. अपघातानंतर गाडीची तांत्रिक तपासणी करण्यात येणार आहे. अपघाताचे प्राथमिक कारण बसच्या ब्रेकचा फेल होणे असल्याचे समजले असले, तरी या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.


 या अपघातानंतर प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती. एसटी प्रशासनाने त्वरित तपासणी आणि योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या