घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

जालन्यात ग्राम महसूल अधिकारी लाचेच्या जाळ्यात

जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा कार्यवाहीत 2,500 रुपयांची लाच घेणारा अधिकारी रंगेहात पकडला


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     जालना जिल्ह्यातील पारध येथे आज दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या यशस्वी सापळा कारवाईत ग्राम महसूल अधिकारी अभय कुलकर्णी व खाजगी इसम कृष्णा दळवी यांना रंगेहात पकडण्यात आले. तक्रारदाराने त्यांच्या आईच्या नावाने खरेदी केलेल्या जमिनीचा फेर घेण्यासाठी अर्ज केला होता, त्यासाठी कोणत्याही अधिकृत फीस नसताना 3,000 रुपयांची लाच मागण्यात आली होती.


तक्रारीची तपासणी: 

   तक्रारदाराने जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी तक्रार दिली होती. त्यानंतर आज पारध येथे आरोपीच्या कार्यालयात पडताळणी करण्यात आली. या तपासणीत खाजगी इसम कृष्णा दळवी याने तक्रारदाराकडून 3,000 रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने काही रक्कम कमी करण्याची विनंती केली, परंतु आरोपी कुलकर्णी यांनी 2,500 रुपये स्वीकारण्यास मान्यता दिली.

सापळा कारवाई: 

  सापळा कार्यवाहीत, तक्रारदाराकडून आरोपी क्र. 2 खाजगी इसम कृष्णा दळवी याने 2,500 रुपये स्वीकारले. त्यानंतर, आरोपी दळवीला रंगेहात पकडण्यात आले.

आरोपीचे अंगझडतीत मिळालेल्या वस्तू:

  खाजगी इसम कृष्णा दळवीकडून 2,500 रुपये पंचासमक्ष जप्त करण्यात आले. शिवाय, आरोपीच्या अंगझडतीत आणखी 28,290 रुपये मिळाले, ज्याचे समाधानकारक स्पष्टीकरण आरोपीकडून मिळाले नाही. एकूण 30,790 रुपये जप्त करण्यात आले आहेत.

घरझडती व इतर तपास: 

   आरोपीच्या घराची झडती सुरू आहे, आणि आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपी क्र. 1 अभय कुलकर्णीचा शोध घेऊन अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर आरोपी क्र. 2 कृष्णा दळवीला अटक करण्यात आली आहे. आरोपीचा मोबाईल ताब्यात घेऊन तपास सुरू आहे.

सापळा पथकाचे अधिकारी व सदस्य: 

   सापळा कार्यवाहीचे नेतृत्व पोलिस उपअधीक्षक बी. एम. जाधवर यांनी केले. त्यांच्या सोबत पोलिस अंमलदार भालचंद्र बिनोरकर, गणेश चेके, व अशोक राऊत होते.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या