घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
आज दिनांक २४ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी गोंदी पोलीस स्टेशनला वार्षिक तपासणीच्या कामी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी गोंदी पोलिसांच्या मानवंदनेचा स्वीकार करून वर्षभरातील पोलीस स्टेशनच्या कामगिरीचा आढावा घेतला. गोंदी पोलिसांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत त्यांनी पोलिसांचे कौतुक केले.
यावेळी, मिश्र यांनी सर्व पोलीस अंमलदारांशी सैनिक संमेलनाच्या माध्यमातून संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी संपूर्ण पोलीस स्टेशन परिसर, इमारत, व सर्व उपलब्ध रेकॉर्डची तपासणी देखील केली.
वार्षिक तपासणीदरम्यान जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड विशाल खांबे, तसेच गोंदी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आशिष खांडेकर आणि गोंदी पोलीस स्टेशनचा सर्व स्टाफ उपस्थित होता.
तपासणी दरम्यान, विशेष पोलीस महानिरीक्षक मिश्र यांनी हद्दीतील सर्व पोलीस पाटलांशी संवाद साधला. तसेच, प्रथम फेस फाउंडेशनच्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळवून देण्यात आलेल्या कामगिरीचे विशेष कौतुक केले.
Comments
Post a Comment