घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर पोलीस शिपायाकडून अत्याचार

 जालना जिल्ह्यात गुन्हा दाखल;पीक मोबाईल पथकाकडे तपास सोपवला



       छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका २४ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून जालना जिल्हा पोलीस दलातील एका पोलीस शिपायाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. जालना पोलीस दलात कार्यरत असलेल्या संशयित शिपाई संदीप वसंत सोनवणे (वय २८) याने या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले आणि तिच्यावर दोन महिने शारीरिक अत्याचार केले. असे तक्रारीत नमूद केले आहे. ही घटना पोलीस प्रशासनात धक्का देणारी असल्यामुळे कमालीची गुप्तता बाळगली जात आहे.

     शिपाई सोनवणे याने छत्रपती संभाजीनगर येथे नर्सिंग अभ्यासक्रम शिकणाऱ्या या २४ वर्षीय तरुणीला लग्नाचे वचन दिले आणि त्यानुसार ९ ऑक्टोबर २०२४ ते २ डिसेंबर २०२४ या कालावधीत पोलीस क्वार्टर्समध्ये सतत संबंध ठेवले. मात्र, नंतर सोनवणेने दुसऱ्या तरुणीसोबत लग्न ठरवल्याची माहिती त्या तरुणीला मिळताच तिने थेट जालना तालुका पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

    सदर तक्रारीनुसार, जालना पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ६९ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास पिंक मोबाईल पथकाकडे सोपविण्यात आला आहे. पुण्यात घडलेल्या बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात वातावरण तापलेले असतानाच या घटनेमुळे पोलीस खात्याची अब्रू धोक्यात आल्यामुळे प्रशासनाने घटनेची गुप्तता पाळल्याचे समजते.

      पोलीस प्रशासनावरील या गंभीर आरोपांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या