अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

जालन्यात एसटीचे ब्रेक फेल झाल्याने थेट प्लॅटफॉर्मवर चढली !

सुदैवाने हानी टळली ! चार ते पाच जण जखमी



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

 आज सकाळी अंबड बस स्टँड येथे एक अपघात घडला. यात गाडी क्रमांक एमएच 20 बीएल 1606 या गाडीचा ब्रेक फेल झाल्याने गाडी थेट प्लॅटफॉर्मवर चढली. प्राथमिक माहिती नुसार, या घटनेत चार ते पाच जण जखमी झाले आहेत. अशी माहिती मिळाली.



  मिळालेल्या माहितीनुसार अपघाताच्या वेळी बसमध्ये अनेक प्रवासी होते, मात्र सुदैवाने मोठा अपघात टळला. जखमींना तत्काळ जालना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले आहे.


 


गाडीचा चालकाचे नाव राठोड असल्याचे समजते. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती या अपघातानंतर गाडीची तांत्रिक तपासणी केली जाणार असून, या घटनेच्या कारणांची चौकशी सुरू करण्यात येणार आहे. गाडीच्या ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाला असल्याचे समजले असले तरी, याविषयी अधिक तपास सुरू आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या