घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घनसावंगी विधानसभा मतदार संघात एकूण ११८७६ घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण करण्यात येणार असल्याची माहिती घनसावंगीचे आमदार हिकमत उढाण यांनी दिली.
प्रधानमंत्री आवास योजना मंजुरी व वितरण:
घनसावंगी विधानसभा मतदार संघातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ सन २०२४-२५ मधील लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि पहिला हप्ता वितरणाचा कार्यक्रम राज्यस्तरीय आहे. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत राज्यभरातील १० लाख लाभार्थ्यांना DBT द्वारे पहिला हप्ता वितरीत होणार आहे.
घनसावंगी तालुक्यातील मंजुरी व हप्ता वितरण:
घनसावंगी विधानसभा मतदार संघात ११,८७६ घरकुलांचे उदिष्ट आहे, त्यापैकी घनसावंगी तालुक्यातील ८८७६ घरकुलांचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. यापैकी ८१४३ लाभार्थ्यांना घरकुलांसाठी मंजुरी मिळाली आहे, आणि २२/०२/२०२५ रोजी ६४३१ लाभार्थ्यांना पहिला हप्ता DBT द्वारे वितरीत होणार आहे.
अंबड तालुक्यातील लाभार्थ्यांना मंजुरी:
अंबड तालुक्यातील ४१ गावांमध्ये ३७०० घरकुलांचे उद्दिष्ट आहे.यापैकी ३४४० लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे, आणि २७७१ लाभार्थ्यांना २२/०२/२०२५ रोजी DBT द्वारे पहिला हप्ता वितरीत होणार आहे.
जालना तालुक्यातील मंजुरी व वितरण:
जालना तालुक्यातील ४२ गावांमध्ये ३०१९ घरकुलांचे उद्दिष्ट आहे, त्यापैकी २६७४ लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली आहे. या लाभार्थ्यांना देखील DBT द्वारे पहिला हप्ता लवकरच वितरीत होणार आहे.
११८७६ घरकुलांसाठी पहिला हप्ता वितरण:
एकूण ११८७६ घरकुल लाभार्थ्यांना घनसावंगी विधानसभा मतदार संघात पहिला हप्ता वितरीत करण्यात येणार आहे.
प्रस्ताव न सादर केलेल्या लाभार्थ्यांसाठी सूचना:
अंबड तालुक्यातील ९०९ लाभार्थ्यांनी अद्याप घरकुलाचे प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केलेले नाहीत. यासाठी आमदार हिकमत उढाण यांनी आव्हान केले आहे की, लाभार्थ्यांनी तात्काळ पूर्ण कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावेत.
अडचणींचे निराकरण:
जर कोणत्याही लाभार्थ्यांना अडचणी येत असतील, तर त्यांनी जनसंपर्क कार्यालय, घनसावंगी येथे संपर्क साधावा, असे आवाहन आमदार हिकमत उढाण यांनी केले आहे.
Comments
Post a Comment