घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
अंबड पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 20/02/2025 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे एक मोठी कारवाई पार पडली. आयपीएस सिद्धार्थ बारवाल यांनी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ सुत्रे हलवली असता पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये अवैधरित्या देशी व विदेशी दारूची विक्री करण्यासाठी जात असलेला एक इसम पोलिसांच्या हाती लागला. सहा. पोलीस निरीक्षक अमोल गुरले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संशयित कार अडवून तिची तपासणी केली असता 24,440/- रुपये किमतीची देशी व विदेशी दारू, तसेच आरोपीच्या अंगझडतीत 46,200/- रुपये रोख मिळाले. त्याचप्रमाणे 4,00,000/- रुपये किमतीची स्विफ्ट कार जप्त करण्यात आली.
छोटा हत्ती वाहनातून पाणी बॉटलच्या बॉक्सखाली लपवून विदेशी दारूची तस्करी
सदर घटनेत आणखी एक मोठी कारवाई आयपीएस सिद्धार्थ बारवाल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. त्यांनी विदेशी दारूची तस्करी करणाऱ्या छोटा हत्ती वाहन (क्र. एमएच-21, एक्स-5305) चा पाठलाग करून वाहन जप्त केले. वाहनात पाण्याच्या बॉटलच्या बॉक्सखाली लपवून ठेवलेले 13 बॉक्स विदेशी दारू सापडले. यावेळी सिद्धार्थ बारवाल यांच्या नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक अमोल गुरले, पोलीस हवालदार विष्णु चव्हाण, दीपक पाटील, अरुण मुंडे, स्वप्निल भिसे आणि इतर अधिकारी सहभागी होते.
विदेशी दारूच्या 13 बॉक्ससह वाहन जप्त
दोन्ही घटनांमध्ये एकूण 4,70,640/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपींवर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment