शेतीपिक नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी ‘फार्मर आयडी’ अनिवार्य:शासनाने जारी केले परिपत्रक

अॅग्रिस्टॅक योजनेशी एकत्रिकरणाची प्रक्रिया १५ जुलैपासून लागू वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिक नुकसानीच्या मदतीसाठी आता कृषी विभागाच्या ‘अॅग्रिस्टॅक’ योजनेत नोंदणी करून मिळालेला शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) अनिवार्य करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने २९ एप्रिल २०२५ रोजी यासंदर्भात अधिकृत परिपत्रक जाहीर केले आहे. १५ जुलै २०२५ पासून नवीन नियम अंमलात येणार या नव्या प्रक्रियेनुसार, १५ जुलै २०२५ पासून मदत व पुनर्वसन विभागाच्या नैसर्गिक आपत्ती मदत योजनेतून शेतीपिक व शेतजमिन नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचा 'फार्मर आयडी' असणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने अॅग्रिस्टॅक योजनेत आपली नोंदणी करून आपला आयडी मिळवणे आवश्यक ठरणार आहे. पंचनाम्यात ‘फार्मर आयडी’साठी स्वतंत्र रकाना शेतीपिक नुकसान पंचनामे करताना आता शेतकरी ओळखपत्र क्रमांकासाठी (फार्मर आयडी) स्वतंत्र रकाना ठेवण्यात येणार आहे. पंचनामे पारंपरिक पद्धतीने केले जात असले तरी, या नव्या रकान्यात संबंधित शेत...