घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या ग्रामीण गृहनिर्माण विभागाने प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत सुरू असलेल्या 'आवास+ 2024' घरगुती सर्वेक्षणासाठी मुदत वाढविली आहे. याअंतर्गत सर्व पात्र ग्रामीण कुटुंबांची ओळख पटवण्यासाठी सेल्फ सर्वेक्षणाची अंतिम तारीख आता १५ मे २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
मंत्रालयाने याआधी २८ मार्च २०२५ रोजी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना ३० एप्रिल २०२५ पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्यास सांगितले होते. मात्र, राज्यांकडून आलेल्या विनंत्यांचा विचार करून ग्रामीण विकास विभागाने आणखी १५ दिवसांची मुदतवाढ जाहीर केली आहे.
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनाला सूचित करण्यात आले आहे की, या वाढीव मुदतीदरम्यान सर्व पात्र कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करावे. यासाठी 'आवास+ 2024' मोबाईल अॅप्लिकेशन चा वापर करून स्वयं-सर्वेक्षण प्रक्रिया राबवावी आणि त्याची योग्य ती पडताळणी करावी.
ग्रामीण विकास विभागाचे संचालक शक्तीकांत सिंह यांनी सांगितले की, "राज्य सरकारांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या राज्यातील सर्व पात्र ग्रामीण कुटुंबांना या योजनेत समाविष्ट करावे आणि सेल्फ सर्वेक्षणाच्या माध्यमातून त्यांची नोंदणी सुनिश्चित करावी."
ही माहिती मंत्रालयाच्या सचिव (ग्रामीण विकास), उपमहासंचालक (ग्रामीण गृहनिर्माण), सर्व राज्यांचे व केंद्रशासित प्रदेशांचे नोडल अधिकारी, तसेच डीओआरडीच्या एनआयसी युनिटला देखील कळवण्यात आली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपला सेल्फ सर्वेक्षण १५ मे २०२५ च्या आत पूर्ण करून प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या लाभासाठी पात्रता निश्चित करावी.
Comments
Post a Comment