घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

अबबब ! चक्क ऊसाला सात हजार पाचशे रुपये विक्रमी भाव

 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     कडक उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना थंड पेयांप्रती जनतेचा ओढा प्रचंड प्रमाणात वाढला आहे. विशेषतः ऊसाचा ताजा रस पिण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील रसवंती गृहे आणि ज्यूस सेंटरमध्ये नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर ऊसाला तब्बल ७५०० रुपये प्रती टन इतका विक्रमी भाव मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

   गेल्या काही दिवसांपासून शीतपेयांच्या मागणीने झपाट्याने वाढ केली असून रस तयार करण्यासाठी लागणाऱ्या ऊसाला मोठी मागणी आहे. रसवंती चालक पांडुरंग मिंधर यांनी सांगितले की, "सध्या जागेवर ऊस ७५०० रुपये टन दराने खरेदी करावा लागत आहे. यासोबतच वाहतूक खर्च सुमारे १५०० रुपये प्रती टन धरल्यास एकूण खर्च ८५०० रुपये टन इतका होतो आहे."

   यंदाच्या वर्षी मार्च महिन्यापासूनच तापमानाने चढ चढाव घेतला आहे. त्यामुळे पारंपरिक चहा किंवा कॉफीऐवजी थंड आणि आरोग्यदायी पेयांची निवड करण्याकडे जनतेचा कल वाढला आहे. विद्यार्थी, पालक, मजूर वर्ग आणि इतर सर्वसामान्य नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी ऊसाच्या रसाला प्राधान्य देत आहेत.

   गेल्या काही वर्षांतील अवकाळी पावसामुळे रसवंती व्यावसायिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. मात्र यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे रस व्यवसायाला नवी उभारी मिळत असून शेतकरी, ऊस तोड मजूर आणि व्यावसायिक यांना चांगला आर्थिक फायदा होतो आहे.

ऊसाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे – नागरिकांमध्ये वाढलेले जागरूकता

   ऊसाच्या रसात असलेले अल्फा हायड्रॉक्सी एसिड त्वचेसाठी फायदेशीर आहे, तसेच यात भरपूर प्रमाणात इलेक्ट्रोलाइट्स असल्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. त्यामुळे ऊस रस अधिकाधिक लोकप्रिय होत आहे.

   रसवंती व्यवसायामुळे केवळ ग्राहकांनाच नव्हे तर शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळतो आहे. परिणामी, ग्रामीण भागातही ऊसाचा रस सहज उपलब्ध होत असून उन्हाळ्यातील हा पेय पर्याय सर्वाधिक यशस्वी ठरत आहे. यामुळे उन्हाळ्याच्या संपूर्ण हंगामात रस व्यवसाय तेजीत राहील, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या