जालना जिल्ह्यात २५ ते २७ एप्रिल दरम्यान यलो अलर्ट; विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांच्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात २५ ते २७ एप्रिल दरम्यान यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत काही भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाचा तसेच ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून खबरदारीचे उपाय योजावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.


नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची काळजी :

 हे करावे 

  विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असल्यास अनावश्यक प्रवास टाळावा.

मोकळ्या जागेत असल्यास सुरक्षित इमारतीचा आसरा घ्यावा. जर सुरक्षित जागा उपलब्ध नसेल तर सखल जागा निवडून गुडघ्यात डोके घालून बसावे.

घरात किंवा सुरक्षित जागेत थांबावे. बाल्कनी, छत, ओटा यांवर थांबू नये.

घरात असताना विद्युत उपकरणे बंद करावीत.

विजेचे खांब, लोखंडी वस्तू आणि तारांचे कुंपण यापासून दूर रहावे.

पाण्यात उभे असल्यास तात्काळ पाण्यातून बाहेर यावे.


हे करू नये 

विजा चमकत असताना लँडलाईन फोनचा वापर करू नये.

शॉवरखाली आंघोळ किंवा बेसिनचे नळ वापरू नयेत.

कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये.

लोखंडी तंबू, शेड यामध्ये आश्रय घेऊ नये.

उंच झाडांखाली किंवा धातूंच्या मनोऱ्याजवळ थांबू नये.

उघड्या दारांमधून किंवा खिडक्यांमधून विजा पाहू नयेत.

    जालना जिल्ह्यात संभाव्य हवामान बदल लक्षात घेता नागरिकांनी आणि संबंधित यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश महाडिक यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!