गोदावरीतून अवैध वाळू उपसा करणारे सहा हायवा जप्त, साडेतीन कोटींचा मुद्देमाल ताब्यात

 अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांची आपेगाव शिवारात मध्यरात्री धाड: 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   अंबड तालुक्यातील आपेगाव शिवारातील गोदावरी नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी मध्यरात्री अचानक धाड टाकली. या कारवाईत अवैध वाळू उपसासाठी वापरले जात असलेले तब्बल सहा हायवा ट्रक जप्त करण्यात आले असून, सुमारे ३.५ कोटी रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.


     ही कारवाई २५ एप्रिलच्या मध्यरात्री करण्यात आली. तहसीलदार चव्हाण यांना गुप्त माहितीच्या आधारे ही धाड टाकण्यात आली. घटनास्थळी पोहोचताच, काही ट्रकचालकांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे काही हायवा घटनास्थळीच पकडण्यात आल्या.

    दरम्यान, या अवैध वाळू उपसाला स्थानिक प्रशासनातील काही व्यक्तींचा हात असल्याचा संशय व्यक्त होत असून, या प्रकरणात आपेगावचे सरपंच, उपसरपंच आणि पोलीस पाटील यांच्यावरही गोपनीय चौकशी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. या चौकशीत दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

   तहसीलदार चव्हाण यांच्या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून, स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर आळा घालण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची ठरणार आहे.



Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!