जालना शहरातील तरुणाचा खून ! जामवाडी शिवारात पेट्रोल पंपाजवळ मृतदेह आढळल्याने खळबळ
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
या घटनेची माहिती मिळताच जालना तालुका पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, सध्या घटनास्थळी पंचनामा सुरू आहे. मृतदेहाच्या डोक्यावर व अंगावर गंभीर मारहाणीच्या खुणा व रक्ताचे डाग दिसून आले असून, प्राथमिक पाहणीत हा खून दुसऱ्या ठिकाणी करून मृतदेह या निर्जन भागात आणून टाकण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलीस या प्रकरणाचा तपास अत्यंत गांभीर्याने करत असून, खुनाचे नेमके कारण काय, कुणी व का केला याबाबत विविध कोनातून तपास सुरू आहे. स्थानिक रहिवाशांनीही मृतदेह पाहिल्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती दिल्याचे समजते.
दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे. हा खून कोणत्या कारणावरून झाला, याबाबतचे धागेदोरे लवकरच मिळतील, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
Comments
Post a Comment