तीर्थपुरीत उद्या बंद; पहेलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
काश्मीरमधील पहेलगाम येथे निष्पाप भारतीय नागरिकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ, व्यापारी महासंघ तीर्थपुरी यांच्या वतीने उद्या, दिनांक २७ एप्रिल रविवार रोजी तीर्थपुरीतील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहेत. यासंदर्भात आज व्यापारी महासंघाने तीर्थपुरी पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी नागरिकांवर बेछूट गोळीबार करत भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. त्या निषेधार्थ आणि शहीद नागरिकांना आदरांजली अर्पण करण्यासाठी तीर्थपुरीतील व्यापारी उद्या आपली दुकाने व व्यवसाय बंद ठेवून आपला निषेध व्यक्त करणार आहेत.
सर्व व्यापाऱ्यांना शांततेच्या मार्गाने बंदमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. बंद दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, बाजारपेठा बंद राहणार आहेत. तसेच नागरिकांनी बंदच्या काळात सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment