घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

जालना - खून करणाऱ्या आरोपीस दोन तासांत अटक; स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कार्यवाही

 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   जालना तालुका पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या खून प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने केवळ दोन तासांत आरोपीस अटक करून अत्यंत कौशल्यपूर्ण आणि जलद कार्यवाही केली.

   दिनांक २५ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास, नरेश उर्फ बंटी नारायण रंजवे (रा. कन्हैया नगर, जालना) या इसमाचा देऊळगावराजा रोडवरील हॉटेल भागीरथी टी हाऊसच्या मागील मोकळ्या जागेत, जामवाडी शिवारात अज्ञात इसमाने खून केला होता. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक जालना यांनी पंकज जाधव, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जालना यांना तात्काळ आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले.



    पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने एक विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेतला असता, आरोपी संदीप ज्ञानेश्वर राऊत (रा. कन्हैया नगर, जालना) हा जामवाडी येथे असल्याचे समजले. त्वरित कारवाई करत पोलीस पथकाने आरोपीस ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

    चौकशीतून उघड झाले की, मयत नरेश उर्फ बंटी याने आरोपीस दारू पाजण्याचा आग्रह केला होता. त्यातून वाद होऊन मयताने आरोपीच्या आईबद्दल अपशब्द वापरले. त्यामुळे संतप्त होऊन आरोपी संदीपने लोखंडी कुऱ्हाडीने गळ्यावर वार करून नरेश याचा खून केला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाणे, जालना येथे आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   ही यशस्वी कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. कार्यवाहीत सहा. पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोउपनि राजेंद्र वाघ, तसेच पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, गोपाल गोशिक, रामप्रसाद पव्हरे, भाऊराव गायके, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, कैलास खाडे, जगदीश बावणे, संभाजी तनपुरे, सुधीर वाघमारे, सतिश श्रीवास, देविदास भोजणे, आक्रूर धांडगे, कैलास चेके, सोपान क्षिरसागर, संदीप चिंचोले, रमेश काळे, किशोर पुंगळे, गणपत पवार, सागर बाविस्कर व दत्ता वाघुंडे यांचा सहभाग होता.

स्थानिक गुन्हे शाखेच्या या जलद आणि अचूक कार्यवाहीमुळे परिसरात पोलीस प्रशासनाबद्दल जनतेमध्ये समाधान व्यक्त होत आहे 


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या